ETV Bharat / state

Thane Crime : दांडिया खेळताना बहिणीला धक्का देणाऱ्या तरुणाला भावाने जाब विचारातच  भावावर हत्याराने वार, भाऊ गंभीर - Brutally beat the brother

बहिणीला धक्काबुक्की केल्याच्या वादावरुन तरुणीच्या भावाला जबर मारहाण केल्याची घटना नेतिवली येथील प्रबोधकर ठाकरे शाळेच्या मैदानावर ही घटना घडली. या प्रकरणी तीन जणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी आद्यप फरार असून पोलिसांकडून शोध सुरू आहे.

Thane Crime
Thane Crime
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 24, 2023, 10:42 PM IST

Updated : Oct 24, 2023, 11:00 PM IST

मंजुमीलची प्रतिक्रिया

ठाणे : गरब्यात दांडिया खेळत असताना एका तरुणानं बहिणीला धक्काबुक्की केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. याबाबत भावानं जाब विच्यारल्यावर त्याला तीन तरुणांनी बेदम मारहाण केलीय. कल्याण पूर्वेतील नेतिवली येथील प्रबोधकर ठाकरे शाळेच्या मैदानावर ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात हल्लेखोर तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मंजुमील अहमद शेख (१९) असं या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या भावाचं नाव आहे. अमन असं हल्लोखोराचं नाव असून त्याचे दोन साथीदार अद्याप फरार आहे. पोलिसांनी त्या तिघांवरही गुन्हा दाखल केला आहे.

दांडिया खेळताना वाद : देशभरात नवरात्रीनिमित्त ठिकठिकाणी धुमधडाक्यात तरुणाई गरब्यांमध्ये दांडिया खेळताना दिसत आहे. अशातच कल्याण पूर्वेतील नेतिवली येथील प्रबोधकार ठाकरे शाळेच्या मैदानात गरब्याचं आयोजन करण्यात आलं. त्यातच 23 ऑक्टोंबर रोजी रात्रीच्या सुमारास या ठिकाणी जखमी मंजुमील हा आपल्या १७ वर्षीय अल्पवीयन बहिणीसह मित्रांसोबत गरब्यात दांडिया खेळत होता.

भावाला जबर मारहाण : आरोपी टवाळखोरही दांडिया खेळत असतानाच अल्पवयीन बहिणीला एका टवाळखोरानं धक्का दिला. धक्का दिल्याचं पाहून भावानं टवाळखोराला जाब विचारला असता दोघात वाद झाला. मात्र काही क्षणात हा वाद विकोपाला जात टवाळखोरांनी भावाला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी भावाला वाचविण्यासाठी बहिणी आली असता, तिला धक्काबुकी करत तिच्या डोक्याचे केस पकडून तिला जोरदार धक्का दिला. त्यानंतर टवाळखोरांपैकी एकानं धारधार हत्यारानं वार करून भावाला गंभीर जखमी केलं. या घटनेमुळं गरबा कार्यक्रमात एकच धावपळ उडाली.

तरुणाचा एक पाय फॅक्चर : गंभीर जखमी अवस्थेत भावाला त्याच्या मित्रांनी एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यावेळी तरुणाचा एक पाय फॅक्चर झाला आहे. सद्या त्याची प्रकृतीस्थिर असल्याचं सांगण्यात आलं आहे. दुसरीकडं जखमी मंजुमील शेख यांच्या तक्रारीवरून कोसळेवाडी पोलीस ठाण्यात टवाळखोर त्रिकुटावार भादंवि कलम ३२४, ३२३, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र जखमी तरुणानं पोलिसांनी अल्पवीयन बहिणीशी केलेली छेडछाड प्रकरणी गुन्हा दाखल केला नसल्याचं सांगितलंय. तसंत त्यांनं पोलिसांच्या तपासावर सवाल उपस्थित केलाय. या संदर्भात या गुन्ह्याचा तपास करणारे पोलीस हवालदार नामदेव के. गोडे यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला असता या गुन्ह्यातील एकही आरोपीला अटक केला नसल्याची माहिती त्यांनी दिलीय. आरोपींचा शोध सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलंय.

हेही वाचा -

  1. Husband Torture Wife : विदेशात पती करायचा पत्नीचा छळ; भिवंडीत गुन्हा दाखल
  2. Thane Crime News: पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार; पतीसह सासरच्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल
  3. Nigerian Arrested In Nagpur : ऑर्गनिक औषध पावडरच्या नावाखाली चक्क माती विकली; नायजेरीयन अटकेत

Last Updated : Oct 24, 2023, 11:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.