ETV Bharat / state

धक्कादायक! नशेसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने दगडाने ठेचून मामेभावाची हत्या

नशेसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मित्राच्या मदतीने नात्याने मामे भाऊ असलेल्या तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना भिवंडी तालुक्यातील भादवड ते पोगाव पाईप लाईन रस्त्यात घडली आहे.

crime
पोलीस ठाणे
author img

By

Published : Oct 19, 2021, 9:52 PM IST

ठाणे - नशेसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मित्राच्या मदतीने नात्याने मामे भाऊ असलेल्या तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना भिवंडी तालुक्यातील भादवड ते पोगाव पाईप लाईन रस्त्यात घडली आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, या दोन्ही आरोपींना शांतीनगर पोलिसांनी अटक केली आहे. शफिक रफिक अंसारी (वय १९ रा . शांतीनगर), अमीर उर्फ फैजान रज्जाक सय्यद (२०) असे हत्या प्रकरणी अटक आरोपींची नावे आहेत. तर मोहमद आसिफ सलीम अंसारी (वय १९) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.

तिघेही फिरण्यासाठी गेले असता घडला प्रकार

आरोपी व मृतक तिघेही मित्र असून नात्याने मृतक आसिफ हा एका आरोपीचा मामे भाऊ लागत आहे. समवयस्क असल्याने ते तिघेही चांगले मित्र देखील होते. सोमवारी हे तिघे शांतीनगर परिसरात असलेल्या भादवड ते पोगाव या मुंबई महापालिकेच्या पाईप लाईनवर फिरायला गेले होते. त्यावेळी मृत आसिफकडे दोघा आरोपींनी नशेसाठी पैसे मागितले होते. ते देण्यास आसिफने नकार दिल्याने त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. त्यावेळी शफिक व आमिर या दोघांनी दगडाने ठेचून आसिफची निर्घृण हत्या केली.

आरोपींना २५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

प्रकरणी मृतक असिफची आत्या शकीला रमजान अंसारी हिने शांतीनगर पोलीस ठाण्यात शफिक व अमीर या दोघांविरोधात तक्रार दाखल केली. शांतीनगर पोलिसांनी या दोघांनाही काल रात्रीच्या सुमारास भिवंडीतून अटक केली आहे. अटक आरोपींना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता २५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश बडाख करीत आहेत.

हेही वाचा - जामीनसाठी मदत केली नाही म्हणून गुंड मुकेशचा खून; आरोपी शेर खानला गुजरातमधून अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.