ETV Bharat / state

Thane Rural Police: आंतरराष्ट्रीय बेल्ट व मास्क रेसलींग स्पर्धेत ठाणे ग्रामीण महिला पोलिसाची चमदार कामगिरी - Brilliant performance of Thane Rural Women

आंतरराष्ट्रीय बेल्ट व मास्क रेसलींग चॅम्पिअनशिपमध्ये ( International Belt and Mask Wrestling Championship ) शीतल मल्लिकार्जुन खरटमल ( Sheetal Mallikarjun Kharatmal ) यांनी उझेकिस्तान, अझरभाईजान, किर्गिस्तान, पाकिस्तान, तुर्कमेनिस्तान अशा विविध देशांतील स्पर्धकांशी स्पर्धा करीत देशाला महिला ५५ किलो वजनी गटातून आंतरराष्ट्रीय बेल्ट रेस्लींग प्रकारात कांस्यपदक ( Bronze medal ) व मास्क रेसलिंग प्रकारात रौप्यपदक ( Silver Medal ) प्राप्त करून दिले ( Thane Rural Police Force ) आहे.

Sheetal Mallikarjun Kharatmal
शीतल मल्लिकार्जुन खरटमल
author img

By

Published : Aug 5, 2022, 5:05 PM IST

ठाणे : युरोप देशातील बाकु आझर भाईजान येथे २८ जुलै ते ३ ऑगस्ट २०२२ रोजी झालेल्या आंतरराष्ट्रीय बेल्ट व मास्क रेसलींग चॅम्पिअनशिपमध्ये ( International Belt and Mask Wrestling Championship ) उझेकिस्तान, अझरभाईजान, किर्गिस्तान, पाकिस्तान, तुर्कमेनिस्तान अशा विविध देशांतील स्पर्धकांशी स्पर्धा करीत ठाणे ग्रामीण पोलीस दलात ( Thane Rural Police Force ) कार्यरत असलेल्या शीतल मल्लिकार्जुन खरटमल ( Sheetal Mallikarjun Kharatmal ) यांनी आंतरराष्ट्रीय बेल्ट रेस्लींग प्रकारात कांस्यपदक ( Bronze medal ) व मास्क रेसलिंग प्रकारात रौप्यपदक ( Silver Medal ) प्राप्त करून देत देशाचा झेंडा सातासमुद्रापार फडकावला आहे.

भारतीय संस्कृतीचे जतन : 'नॅशनल हाईलँड फेस्टिव्हल' या अझरबैजान प्रजासत्ताक येथील युवा आणि क्रीडा मंत्रालय, जागतिक एथनोस्पोर्ट कॉन्फेडरेशन, अझरबैजान प्रजासत्ताकचे सांस्कृतिक मंत्रालय यांनी आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय महोत्सव स्पर्धेत कल्चर प्रकारात भारतीय संघाला रौप्यपदक प्राप्त करून दिले आहे. विशेष म्हणजे, भारतीय संघाने भारतीय संस्कृतीचे परंपरा जपून भारतीय पोशाख परिधान करून आपल्या भारतीय संस्कृतीचे जतन करून या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला होता.

४२ देशांतील स्पर्धकांचा सहभाग : युरोपातील बाकु आझरभाईजान येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय बेल्ट व मास्क रेसलींग चॅम्पिअनशिपमध्ये ४२ देशांतील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यासाठी महाराष्ट्रतील १३ खेळाडूंची सराव निवड चाचणी ऑल इंडिया ट्रॅडिशनल व्रेस्टेलिन्ग अँड पानक्रेशन फेडरेशन या संस्थेचे तांत्रिक अधिकारी व उपाध्यक्ष सी. ए. तांबोळी याच्यामार्फत करण्यात आली होती. यात ५५ किलो महिला वजनी गटात शीतल मल्लिकार्जुन खरटमल यांची निवड झाली होती.

बेल्ट रेससिंग प्रकारात कांस्यपदक : त्यानंतर युरोपातील बाकु आझरभाईजान येथे २८ जुलै ते ३ ऑगस्ट २०२२ रोजी झालेल्या आंतरराष्ट्रीय बेल्ट व मास्क रेसलींग चॅम्पिअनशिपमध्ये शीतल मल्लिकार्जुन खरटमल यांनी उझेकिस्तान, अझरभाईजान, किर्गिस्तान, पाकिस्तान, तुर्कमेनिस्तान अशा विविध देशांतील स्पर्धकांशी स्पर्धा करीत देशाला महिला ५५ किलो वजनी गटातून आंतरराष्ट्रीय बेल्ट रेस्लींग प्रकारात कांस्यपदक व मास्क रेसलिंग प्रकारात रौप्यपदक प्राप्त केले आहे.

१२ वर्षांपासून ठाणे ग्रामीण पोलीस कार्यरत : शीतल मल्लिकार्जुन खरटमल ठाणे ग्रामीण पोलीस अंमलदार असून, गेली १२ वर्षे त्या सेवेत आहेत. या यशाबाबत शीतल सांगतात की, 'अत्यंत कठीण अशा या स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर माझे मार्गदर्शक असलेल्या सी.ए. तांबोळी सर, मार्गदर्शक व प्रशिक्षक मधुकर पगडे, अमोल साठे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच माझ्या कुटुंबाचाही यात मोठा वाटा असून, आई निर्मला आणि वडील मल्लिकार्जुन यांचीही मी ऋणी आहे'.

६५ सुवर्ण, ४३ रौप्य आणि ९ कांस्य पदकांची कमाई : यापूर्वी शीतल यांनी ज्युडो मार्शल गेम्समध्ये ११ वेळा देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आजवर शीतल यांनी ६५ सुवर्ण, ४३ रौप्य आणि ९ कांस्यपदकांची कामगिरी बजावली आहे.

अर्जुन पुरस्काराने सन्मानित : आजवर टॉप १५ वुमन आयकन पुरस्कार (बंगरुळु), कोहिनूर राष्ट्रीय पुरस्कार (पुणे), सावित्रीबाई फुले पुरस्कार (मुंबई), भारत भूषण पुरस्कार (भोपाळ) अशा नाना पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. खेळातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल शीतल यांना २०२० साली अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

हेही वाचा : Congress Leaders Detained : राहुल गांधी, प्रियंकासह काँग्रेसचे अनेक नेते दिल्ली पोलिसांच्या ताब्यात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.