ETV Bharat / state

ठाण्यात बिबट्याचा बालकावर हल्ला; मोठ्या भावाने धाडसाने वाचवला लहान भावाचा जीव - वनपाल

शेतात करवंद शोधणाऱ्या चिमुकल्या भावावर बिबट्याने हल्ला केला. त्यामुळे मोठ्या भावाने दगड आणि काठीने बिबट्याला पिटाळून लावले. चिमुकल्याची आजीही कोयता घेऊन बिबट्यावर धाऊन आल्याने बिबट्याने घटनास्थळावरुन पळ काढला.

चिमुकल्यांचा सत्कार करताना पोलीस
author img

By

Published : Jun 17, 2019, 10:15 AM IST

Updated : Jun 17, 2019, 11:07 AM IST

ठाणे - करवंदाच्या शोधात फिरणाऱ्या लहान भावावर बिबट्याने हल्ला केला. त्यामुळे जवळच असलेल्या मोठ्या भावाने बिबट्यावर दगड आणि काठीने जोरदार प्रहार करत लहान भावाचा जीव वाचवला. ही घटना मुरबाड तालुक्यातील करपटवाडीत घडली. नरेश काळूराम भला ( वय 14 ) तर हर्षद विठ्ठल भला ( वय 6 ) असे त्या बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या भावांची नावे आहेत.

घटनास्थळासह नरेश आणि हर्षद

टोकावडे परिसरातील झाडघर ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या करपटवाडीत नरेश आणि हर्षद हे आजीसह शेतात भात पेरणीसाठी गेले होते. सकाळी 11 वाजताच्या सुमारास हे दोघे करवंद शोधत शेताच्या बांधावर गेले होते. यावेळी करवंदाच्या जाळीत दबा धरून बसलेल्या बिबट्याने हर्षदवर हल्ला केला. बिबट्याने अचानक हल्ला केल्याने जवळच असलेल्या नरेशने आरडाओरडा करत बिबट्यावर दगड आणि काठीने वार केले. जवळच असलेली आजी कान्हीबाईही कोयता घेऊन बिबट्यावर धाऊन आली. लगतच्या शेतातून कामगारही धावत आले. त्यामुळे बिबट्याने घटनास्थळावरुन पळ काढला.

बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दोन्ही भावांना टोकावडे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी मुरबाड शहरातील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. सध्या त्यांच्यावर या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बिबट्याच्या हल्ल्यामुळे दोन्ही मुले भयभीत झाले असून त्यांच्या अंगावर डोक्यावर ठिकठिकाणी गंभीर जखमा झाल्या आहेत. टोकावडे विभागाचे वनपाल कपिल पवार यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.

वनविभागाने बिबट्याची शोधमोहीम सुरू केली असता, सदर बिबट्या घटनास्थळाच्या काही अंतरावर मृत अवस्थेत आढळून आला आहे. हा बिबट्या मादी असून त्याचा मृतदेह संजय गांधी राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पात नेण्यात आला. त्यानंतर डॉ. प्रशांत गाढवे आणि डॉ. शैलेश पेठे यांनी बिबट्याला कोणतीही इजा झाली नसून त्याचा मृत्यू म्हातारपणामुळे झाल्याचा अहवाल दिला आहे. दरम्यान टोकावडे पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुहास खारमते यांनी लहान भावाचा जीव वाचवणाऱ्या नरेश काळूराम भलाचे कौतुक केले आहे. नरेशने मोठे धाडस दाखवल्यामुळेच हर्षदचा जीव वाचू शकला असे गौरद्गार त्यांनी काढले.

Intro:किट नंबर 319
कल्याण

Body:बिबट्याचा हल्ला ; हल्ल्यात दोन मुलं गंभीर जखमी

ठाणे :- बिबट्याच्या हल्ल्यात शेतात काम करणारी 2 मुलं गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे, ही घटना मुरबाड तालुक्यातील टोकावडे परिसरातील झाडघर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील करपट वाडीत घडली आहे,
नरेश काळूराम भला वय 14 आणि हषद विठ्ठल भला वय 6 असे बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मुलांची नावे आहे,

मिळालेल्या माहितीनुसार मुरबाड तालुक्यातील करपट वाडी येथील घराशेजारी असलेल्या शेतात भात पेरणी साठी नरेश आणि हर्षद हे दोघे आज सकाळी 11 वाजल्याच्या सुमारास गेले होते, त्यावेळी शेताच्या बांधावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने दोघांवर हल्ला केला, त्यावेळ आजीने आरडाओरडा केल्या नंतर लगतच्या शेतातून कामगार धावत आले, आणि त्यांनी या बिबट्याला पळवले,
दरम्यान, बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दोघांनाही टोकावडे विभागाचे वनपाल कपिल पवार यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांना टोकावडे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, त्यानंतर पुढील उपचारासाठी मुरबाड शहरातील मल्टी स्पेशलीलिस्ट हॉस्पिटलमध्ये दाखल केले, सध्या त्यांच्यावर या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे, बिबट्याच्या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे दोन्ही मुलं भयभीत झाले असून त्यांच्या अंगावर डोक्यावर ठिकठिकाणी गंभीर जखमा झाल्या आहेत,
या हल्लेखोर बिबट्यापासुन सावधान राहण्यासाठी इतर गावांनाही वन विभागाच्या वतीने आव्हान करण्यात आले, या बिबट्याची शोध मोहीम वन विभागाने सुरू केली आहे,

फोटो ईमेल केले आहे

Conclusion:
Last Updated : Jun 17, 2019, 11:07 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.