ठाणे - एका २२ वर्षीय नराधमाने ७० वर्षीय आणि ७२ वर्षीय वयोवृद्ध महिलांवर घरात घुसून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना शहापूर तालुक्यातील वाशिंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या प्रकरणी वाशिंद पोलीस ठाण्यात अत्याचारासह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत. भूषण हिंदोळे, असे अटक केलेल्या नरधमाच नाव आहे.
दोन्ही पीडित वयोवृद्ध महिला शहापूर तालुक्यातील वाशिंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतात. २० मार्चला एक वयोवृद्ध महिलेला घरात एकटीला पाहून नराधम घरात घूसूला होता. त्यानंतर पीडितेला ठार मारण्याची धमकी देत या नराधमाने घरातच पीडितेवर बलात्कार केला. मात्र, घडललेल्या घटनेनंतर पीडित महिला भयभीत झाली होती. त्यामुळे या नराधमाने याचाच फायदा घेत पुन्हा २१ मार्चला शेजाऱ्याच्या घरात एकटी असलेल्या दुसऱ्या वयोवृद्ध महिलेच्या घरात घुसून धमकी देत बलात्कार केला. सतत दोन दिवस घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. त्यानंतर २३ मार्चला दोन्ही वृद्ध पीडित महिलांनी वाशिंद पोलीस ठाणे गाठत घडलेल्या प्रसंगाचे कथन करताच नराधमावर अत्याचारासह विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी नराधमाचा शोध सुरू केला असता भूषण हिंदोळे या नराधमास वाशिंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातून २५ मार्चला अटक केली आहे.
हेही वाचा - MNS Mla Raju Patil : 90 टक्क्यांच्यावर आमदार कोट्यधीश; मग मोफत घरे कशासाठी, राजू पाटलांचा सवाल