ETV Bharat / state

पिळदार शरीराची हाव पडली महागात; कृत्रिम आहारामुळे कुर्ल्यातील युवकाच्या दोन्ही किडन्या निकामी - artificial diet side effects

श्रीदीप मुंबईतील रिलायन्स हरिकीसनदास रुग्णालयात उपचार घेत आहे. श्रीदीपने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत अनेक नामांकने मिळवली आहेत. तो आपल्या आहारावरदेखील विशेष लक्ष देत होता. तो कृत्रिम पोषक आहार घ्यायचा मात्र त्याने काही कारणास्तव तो बंद केला. कालांतराने पुन्हा सुरू केला असता श्रीदीपला त्रास होऊ लागला. त्याचा रक्तदाब अनियंत्रित झाला. त्याला उलट्या झाल्याने त्याने डॉक्टरांचा सल्ला घेतला. यावेळी  रक्तदाब अनियंत्रणामुळे त्याच्या दोन्ही किडन्या खराब झाल्याचे समोर आले.

श्रीदीप गावडे
श्रीदीप गावडे
author img

By

Published : Jan 14, 2020, 12:52 AM IST

मुंबई - पिळदार शरीर बनवण्याच्या नादात कृत्रिम आहार घेतल्याने कुर्ल्यातील एका तरूणाच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत. श्रीदीप गावडे, असे या तरूणाचे नाव आहे. श्रीदीप शरीरसौष्ठवपटू होता. श्रीदीपच्या आईने किडनी देऊन त्याचे प्राण वाचवले आहेत. प्रोटीन्सच्या गोळ्यांच्या अतिसेवनाने श्रीदीपवर ही परिस्थिती ओढवली आहे.

कृत्रिम आहारामुळे कुर्ल्यातील युवकाच्या दोन्ही किडन्या निकामी

श्रीदीप मुंबईतील रिलायन्स हरिकीसनदास रुग्णालयात उपचार घेत आहे. श्रीदीपने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत अनेक नामांकने मिळवली आहेत. तो आपल्या आहारावरदेखील विशेष लक्ष देत होता. तो कृत्रिम पोषक आहार घ्यायचा मात्र त्याने काही कारणास्तव तो बंद केला. कालांतराने पुन्हा सुरू केला असता श्रीदीपला त्रास होऊ लागला. त्याचा रक्तदाब अनियंत्रित झाला. त्याला उलट्या झाल्याने त्याने डॉक्टरांचा सल्ला घेतला. यावेळी रक्तदाब अनियंत्रणामुळे त्याच्या दोन्ही किडन्या खराब झाल्याचे समोर आले.

हेही वाचा - अलिबागची बालकलाकार आर्या मोरे 'सावित्रीजोती' मालिकेत साकारतेय 'ही' भूमिका

पिळदार व मजबूत शरीर बनवण्यासाठी अनेकजण तासंतास व्यायाम करतात आणि कृत्रिम आहार घेतात. त्याच्या शरीरावरील दुष्परिणामांकडे मात्र दुर्लक्ष करतात. बाजारात उपलब्ध असलेले कृत्रिम प्रोटीन अतिप्रमाणात घेतल्यास किडनीवर ताण येतो. त्यामुळे किडनीचे कार्य मंदावते आणि काही काळानंतर बंद होते. त्यामुळे कृत्रिम प्रोटीन घेताना डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Intro: पिळदार शरीराच्या नादात कृत्रिम आहाराने कुर्ल्यातील युवकाने दोन्ही किडन्या गमावल्या

मजबूत व पिळदारशरीर बनवण्याच्या नादात कृत्रिम आहार घेतल्याने कुर्ला येथील श्रीदीप गावडे या तरुणाला चांगलेच जीवावर बेतले होते यात त्याला आपल्या दोन्ही किडन्या गमवाव्या लागल्या असून जन्मदात्या आईने किडनी देऊन प्राण वाचवले आहेतBody: पिळदार शरीराच्या नादात कृत्रिम आहाराने कुर्ल्यातील युवकाने दोन्ही किडन्या गमावल्या

मजबूत व पिळदारशरीर बनवण्याच्या नादात कृत्रिम आहार घेतल्याने कुर्ला येथील श्रीदीप गावडे या तरुणाला चांगलेच जीवावर बेतले होते यात त्याला आपल्या दोन्ही किडन्या गमवाव्या लागल्या असून जन्मदात्या आईने किडनी देऊन प्राण वाचवले आहेत .

कुर्ला बैलबाजार येथील रहिवासी श्रीदीप गावडे या तरुणाला मात्र गोळ्यांच्या अतिसेवनाने तो आपल्या दोन्ही किडन्या गमावून बसला आहे. आज तो मुंबईतील रिलायन्स हरिकीसंनदास रुग्णालयात उपचार घेत आहे . श्रीदीप ने आंतरराष्ट्रीय दर्जाचा शरीर सौष्ठव स्पर्धेत अनेक नामांकन मिळवले आहेत. त्यासाठी त्याने अपार मेहनत घेतली आणि आपल्या आहारावर देखील विशेष लक्ष देत तो कृत्रिम पोषक आहार घेत असे मात्र त्याने काही कारणास्तव पोषक आहार बंद केला आणि कालांतरानं पुन्हा सुरू केला असता श्रीदीप ला त्रास होऊ लागला त्याचा रक्तदाब अनियंत्रित झाला त्याला उलट्या होऊ लागल्या त्याने डॉक्टरांचा सल्ला घेतला असता धक्कादायक रित्या कळले की रक्तदाब अनियंत्रणा मुळे त्याच्या दोन्ही किडन्या खराब झाल्या आहेत ,शरीर पिळदार व मजबूत बनवण्यासाठी अनेक जण कित्येक तास व्यायाम करतात आणि कृत्रिम आहार घेत असतात मात्र ते करताना त्याचे काही दुष्परिणाम शरीरावर होतात का याकडे मात्र दुर्लक्ष करतात. बाजारात उपलब्ध असलेले कृत्रिम प्रोटीन घेतात त्यात काही वेळा प्रोटीनच्या गोळया ही घेतात मात्र हे सर्व घेताना काळजी घेणे गरजेचे आहे , या कृत्रिम प्रोटीन मुळे किडनीवर त्राण येतो आणि त्यामुळे किडनीचे कार्य मंदावते आणि काही काळानंतर किडनीचे कार्य बंद होते त्यामुळे अश्या प्रकारे कृत्रिम प्रोटीन घेताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि वेळोवेळी आपली तपासणी करून घ्यावी किंवा गरज नसेल तर सप्लिमेंट चा वापर टाळावा असा सल्ला डॉक्टर देत असतात श्रीदीपला त्याच्या आईने आपली किडनी देऊन दुसरा जन्म दिला आहे. त्यामुळे श्रीदीपचे पुढील जीवन सुदृढ जावो हीच प्रार्थना
Byte - श्रीदीप गावडे - रुग्ण
Byte - अरुनधती गावडे - श्रीदीपची आई
Byte - डॉक्टर सिद्धार्थ लाखानी - किडनी तज्ञ

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.