ETV Bharat / state

पाण्याच्या टाकीत हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळला सुरक्षारक्षकाचा मृतदेह, कंपनीत खळबळ

author img

By

Published : Jul 26, 2020, 6:20 PM IST

मुरबाड शहरालगत असलेल्या एमआयडीसीतील सुपर गॅस कंपनीमध्ये मृत किसन भावर्थे हा सुरक्षारक्षक म्हणून अडीच वर्षापासून कामाला होता. काल रात्रपाळीला हजर झालेला किसान आज सकाळी साडे दहा वाजल्यापासून कंपनीमध्ये दिसत नसल्याने त्याची शोधाशोध सुरू झाली. काही वेळाने त्याचा कंपनीच्या पाण्याच्या टाकीत हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आला.

सुरक्षारक्षकाचा मृतदेह
पाण्याच्या टाकीत हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळला सुरक्षारक्षकाचा मृतदेह, कंपनीत खळबळ

ठाणे : चार तासापासून बेपत्ता असलेल्या एका सुरक्षारक्षकाचा मृतदेह कंपनीच्या पाण्याच्या टाकीत हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. किसन भावर्थे (वय 25) असे मृत सुरक्षारक्षकाचे नाव आहे. तो मुरबाड तालुक्यातील व्यापारी मानिवली (खुर्द) येथे राहणारा होता.

मुरबाड शहरालगत असलेल्या एमआयडीसीतील सुपर गॅस कंपनीमध्ये मृत किसन भावर्थे हा सुरक्षारक्षक म्हणून अडीच वर्षापासून कामाला होता. काल(शनिवार) रात्रपाळीला हजर झालेला किसान आज सकाळी साडे दहा वाजल्यापासून कंपनीमध्ये दिसत नसल्याने त्याची शोधाशोध सुरू झाली होती. तर, आज सकाळच्या सुमारास मृताचा मोठा भाऊ त्याला जेवणाचा डबा घेऊन कंपनीत आला असता, किसन लाईट बंद करण्यासाठी गेल्याचे त्याच्या सहकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे सदर जेवणाचा डबा किसनला देण्याचे सांगून तो आपल्या कामावर निघून गेला.

तासाभराने त्याने पुन्हा किसनला दोनवेळा मोबाईलवर कॉल केल्यानंतर तो अद्याप आला नसल्याचे सेक्युरिटी कॅबिनमधून त्याला सांगण्यात आले. त्यानंतर किसनचा मोठा भाऊ कंपनीमध्ये त्याला शोधण्यासाठी आला असता, किसनच्या पायातील बूट कंपनीमधील एका पाण्याच्या टाकीजवळ आढळून आला. यावेळी संशयाचे निरसन करण्यासाठी तीन लाख लिटर पाणी भरलेली टाकी पोलिसांच्या मदतीने रिकामी करण्यात आली आणि हा धक्कादायक प्रकार समोर आला. किसनचा मृतदेह टाकीमध्ये त्याच्या सुरक्षा गणवेशाच्या साह्याने शरीराला मोठा दगड बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून किसनचा मृतदेह रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात रवाना केला.

दरम्यान, मृत किसनच्या पश्चात त्यांचे आई-वडील मोठा भाऊ, बहीण असा परिवार असून गावातील मनमिळावू आणि चांगल्या स्वभावाचा हा तरुण असल्याची त्याची ओळख होती. त्यामुळे या घटनेने गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. तर हा प्रकार नेमका कसा घडला याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत असून घटनेचा तपास कंपनीमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजवर अवलंबून असल्याचे बोलले जात आहे. तर, या घटनेची संपूर्ण चौकशी व्हावी अशी मागणीही किसनच्या कुटुंबियांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.