ETV Bharat / state

भाईंदर, विरार क्षेत्रातील २२ ठिकाणी नाकाबंदी; चौपाटींवर पोलिसांची नजर - New Year Celebration Bhayander News

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात नववर्ष साजरा होत आहे. यात गर्दी होऊन कोरोनाचा संसर्ग वाढू नये, वाहतुकीचा खोळंबा होऊ नये, तसेच तळीरामांवर कारवाई करण्यासाठी संपूर्ण मुंबईसह मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांनी कंबर कसली आहे.

New Year Celebration Bhayander News
भाईंदर, विरार क्षेत्रातील २२ ठिकाणी नाकाबंदी
author img

By

Published : Dec 31, 2020, 7:11 PM IST

ठाणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात नववर्ष साजरा होत आहे. यात गर्दी होऊन कोरोनाचा संसर्ग वाढू नये, वाहतुकीचा खोळंबा होऊ नये, तसेच तळीरामांवर कारवाई करण्यासाठी संपूर्ण मुंबईसह मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांनी कंबर कसली आहे. पोलिसांनी संपूर्ण शहरातील प्रमुख नाक्यांवर तपासणी केंद्रे तयार केली आहेत.

माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

मीरा-भाईंदर, वसई-विरार क्षेत्रातील २२ ठिकाणी नाकाबंदी असणार आहे. प्रामुख्याने वसई-विरार, मीरा-भाईंदर मधील चौपाटींवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. यासाठी पोलिसांचे विशेष पथक नेमण्यात आले आहे. हॉटेल आणि रेस्टॉरंट्सना रात्री ११ वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. तसेच, जमावबंदी लागू असल्याने पाचपेक्षा अधिक नागरिक एकत्र दिसल्यास त्यांच्यावर पोलीस कारवाई करणार आहे. नागरिकांनी घरात रहावे आणि कुटुंबातील सदस्यांसोबत घरातच नववर्ष साजरा करावा, असे आवाहन मीरा-भाईंदर, वसई-विरार परिमंडळ-२ चे उपायुक्त संजय कुमार पाटील यांनी केले.

हेही वाचा - उंबार्ली टेकडीवर सरत्या वर्षाला निरोप देणाऱ्यांवर पर्यावरणप्रेमींची करडी नजर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.