ठाणे: मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार आई ही सून आणि आरोपी मुलासह अंबरनाथ तालुक्यातील वांगणी गावात राहते. ती अंध असून ठाणे महापालिकेत नोकरी करून कुटुंबाची उपजीविका चालवते. काही वर्षांपूर्वीच तिच्या पतीचे निधन झाले. त्यामुळे घरखर्चाचा भार एकट्या आईवर पडला. त्यातच आरोपी मुलाचे त्याच्या शेजारी राहणाऱ्या एका तरुणीशी प्रेमसंबध जुळले. याच ते दोघेही पळून गेल्याने तरुणीच्या घरच्यांनी दीपंकर दास विरुद्ध मुलीचे अपहरण केल्याची तक्रार कुळगांव पोलीस ठाण्यात दाखल केली होती. याआधारे पोलिसांनी जोडप्याचा शोध घेऊन त्यांना कर्नाटकमधून ताब्यात घेतले. यानंतर आरोपी मुलगा दीपंकर दास याला अटक करून त्याची रवानगी तुरुंगात केली. तर मुलीला तिच्या आई-वडिलांच्या स्वाधीन केले.
गैरसमजूतीतून आईला मारहाण: आरोपी दीपंकर हा जेलमधून जामिनावर सुटला असता, तो प्रेयसीला घेऊन आपल्या आईसोबत राहत होता. तो कामधंदा करत नसल्याने आईकडे पैश्यासाठी तगादा लावत असे. तसेच स्वत:च्या आईलाच मारहाण करायचा. आईने आपल्याला जेलमधून लवकर सोडविण्यासाठी मदत न केल्याचा गैरसमज त्याच्या मनात होता. यातून त्याने २६ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास आईला शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच तिचे डोके भितींवर आपटून तिला गंभीर जखमी केले.
मुलाविरुद्ध गुन्हा दाखल: शेजाऱ्यांना घटनेची माहिती कळताच त्यांनी जखमी आईला बदलापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना आईच्या तक्रारीवरून निर्दयी मुलाविरुद्ध कुळगांव पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा अधिक तपास महिला पोलीस हवालदार हेमा आसवाले करीत आहेत.
मुलाच्या मारहाणीत आईचा मृत्यू: एकीकडे फादर्स-डे निमित्ताने संपूर्ण देशभरात वडिलांचे ऋण व्यक्त केले जात आहे. तर दुसरीकडे मात्र बीड जिल्ह्यातील घाटशिळ-पारगाव येथे एका मुलाने आपल्या आई-वडिलांना काठीने बेदम मारहाण केल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये गंभीर बाब म्हणजे या मारहाणीत आईचा मृत्यू झाला असून वडील गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना नगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नागरिकांमधून या मुलाच्या कृत्याबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे. बाबासाहेब खेडकर असे मारहाण करणाऱ्या विकृत मुलाचे नाव आहे, तर शिवबाई खेडकर असे मृत आईचे नाव आहे.
हेही वाचा: