ETV Bharat / state

खासदार ओवैसीच्या भिवंडीतील नियोजित सभेवरून भाजपचा 'यू टर्न' - ओवेसींची भिवंडीतील जाहीर सभा

सभेला भाजपचा विरोध असून आपण ओवैसींची भिवंडीतील जाहीर सभा उधळून लावू, असा निर्धार भाजप जिल्हा अध्यक्ष संतोष शेट्टी यांनी केला होता. तर भाजपच्या बदललेल्या भूमिकेनंतर एमआयएमचे शहराध्यक्ष खालिद गुड्डू यांनीही खासदार ओवैसींची सभा होणारच, कुणाच्या बापात दम असेल त्यांनी ओवैसींची सभा रोखून दाखवावी, असे प्रतिआव्हान भाजपला केले होते.

भाजप जिल्हा अध्यक्ष संतोष शेट्टी
भाजप जिल्हा अध्यक्ष संतोष शेट्टी
author img

By

Published : Feb 29, 2020, 8:19 AM IST

ठाणे - खासदार असदुद्दीन ओवैसींच्या जाहीर सभेला भाजपचा विरोध असून आपण ओवैसींची जाहीर सभा उधळून लावू, असा निर्धार भाजप नेत्यांनी केला होता. मात्र, सभेचा घटनाक्रम पाहता खासदार ओवैसींच्या भिवंडीतील सभेवरून भाजपच्या नेत्याने 'यू टर्न' घेत, पुढील होणाऱ्या सभेला भाजपच्या शुभेच्छा असल्याचे जाहीर करत ओवैसींच्या सभेच्या वादावर पडदा टाकला आहे.

बोलताना भाजप जिल्हा अध्यक्ष संतोष शेट्टी

विशेष म्हणजे जाहीर सभेला भाजपचा विरोध असून आपण ओवैसींची भिवंडीतील जाहीर सभा उधळून लावू, असा निर्धार भाजप जिल्हा अध्यक्ष संतोष शेट्टी यांनी केला होता. तर भाजपच्या बदललेल्या भूमिकेनंतर एमआयएमचे शहराध्यक्ष खालिद गुड्डू यांनीही खासदार ओवैसींची सभा होणारच, कुणाच्या बापात दम असेल त्यांनी ओवैसींची सभा रोखून दाखवावी, असे प्रतिआव्हान भाजपला केले होते. त्यामुळे एमआयएमच्या प्रतिआव्हानमुळे भिवंडीचे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.

भाजपने ओवैसींची सभेवर घेतलेल्या आक्षेपावर व एमआयएमने केलेल्या प्रतिआव्हानामुळे शांततामय असलेल्या भिवंडीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता, पोलिसांनी एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसींची मनधरणी केल्याने ओवैसींनी स्वतः गुरुवारची (दि.5 मार्च) सभा रद्द केल्याची माहिती एमआयएमचे शहर महासचिव अॅड. अमोल कांबळे यांनी दिली असून ओवैसींची जाहीर सभा मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात होणार असल्याचेही सांगितले.

हेही वाचा - व्हिडिओ व्हायरल: भाजी विक्रेत्याचा किळसवाणा प्रकार, गटारातून काढलेल्या भाज्या विक्रीला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.