ETV Bharat / state

"बोलाचीच कढी बोलाचाच भात"

भाजपच्या ठाणे (खोपट) येथील मुख्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रवक्ते केशव उपाध्ये, शहर अध्यक्ष संदीप लेले, आमदार निरंजन डावखरे हे उपस्थित होते.

author img

By

Published : Dec 26, 2019, 12:31 PM IST

keshav upadhye
केशव उपाध्ये

ठाणे - दहा रुपयांची थाळी म्हणजे 'बोलाचीच कढी अन् बोलाचाच भात' असल्याची टीका भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली. उपाध्ये यांनी ठाणे येथी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी नागरिकत्व सुधारणा कायद, शेतकरी कर्जमाफी अशा विषयावर काँग्रेस आणि महाविकास आघाडीला लक्ष्य केले.

केशव उपाध्ये यांची पत्रकार परिषद

हेही वाचा - ठाकरे सरकार ॲक्सिस बँकेला देणार धक्का.. पोलिसांची खाती राष्ट्रीयकृत बँकेत वळविण्याची मागणी

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा दिलेला शब्द पाळला नसल्याचे उपाध्ये यांनी सांगितले. दोन लाख रुपयांच्या कर्जमाफीची अमंलबजावणी सुद्धा जर मार्चमध्ये होणार असेल तर सरकारने शेतकऱ्यांना धोखा दिला असल्याचे उपाध्ये म्हणाले. नागरिकत्व सुधारणा कायदा या विषयावर भाजपची बाजू मांडताना जनजागृतीची मोहीम राबवण्यात येत आहे. 370 कलम असो किंवा नागरिकत्व सुधारणा कायदा यात कुठल्याही एका जाती धर्माचा विषय नव्हता. भाजपच्यावतीने कायद्याच्या समर्थनार्थ मोर्चे काढल्यामुळे लोकांपुढे सत्य येत असल्याचे उपाध्ये म्हणाले.

अमृता फडणवीस यांनी केलेल्या ट्वीटबद्दल बोलताना उपाध्ये म्हणाले, 'एकीकडे महिला सक्षमीकरण बाबत आपण बोलत असतो दुसरीकडे कोणी आपल्या भावना मांडल्या तर त्यांला विरोध करतो. हे चुकीचे असून सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याने कुणीही व्यक्त होऊ शकतो.'

भाजपच्या खोपट येथील मुख्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहर अध्यक्ष संदीप लेले, आमदार निरंजन डावखरे आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा - साखर क्षेत्रात महाराष्ट्राला पुन्हा अव्वल क्रमांकावर आणायचे आहे - शरद पवार

Intro:दहा रुपयाची थाळी म्हणजे बोलाचीच कढी बोलाचाच भात केशव उपाध्येBody: शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा दिलेला शब्द,अवकाळी पावसाच्या नुकसानी बाबत २५ हजार रुपये देण्याचे आश्वासन,जी दोन लाख रुपयांच्या कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे तीही मार्च मध्ये होणार आहे असे राज्यसरकारचे काम चालू आहे. त्याचप्रमाणे १० रुपयांची थाळी म्हणजे बोलाचीच कडी बोलाचाच भात  असल्याचा आरोप भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा आरोप यांनी ठाण्यात केला. नागरिकत्व सुधारणा कायदा या विषयावर भाजपची बाजू मांडतानाच जनजागृती करण्याची मोहीम राबवण्यात येत आहे .. 370 कलम असो या नागरिकत्व सुधारणा विधायक  यामध्ये  कुठल्याही एका जाती धर्माचा विषय नव्हता देशाचा विचार होता...तसेच एकीकडे महिला सक्षमीकरण बाबत आपण बोलत असतो दुसरीकडे कोणी आपल्या भावना मांडल्या त्यांना त्यांचा स्वतंत्र आहे त्यांनी त्यांचे विचार मांडले त्यात आक्षेप असण्याचं कारण काय...अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी कोण करते -अमृता फडणवीस यांची केशव उपाध्याय यांनी केली पाठराखण ... जी प्रक्रिया असते त्या पद्धतीने मागील सरकारने बँके संदर्भात केली होती परंतु आता या सरकारला काय करायचे ते पुढे बघू.. ऍक्सिस बँके बाबत केशव उपाध्याय जास्त काही बोलले नाही ..तसेच विजयसिंह मोहिते पाटील यांच्या बद्दल देखील मला माहिती नाही म्हणून  बोलन टाळल..भाजपच्या खोपट येथील मुख्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपाध्ये यांच्यासह शहर अध्यक्ष संदीप लेले , आमदार निरंजन डावखरे आदी मान्यवर उपस्थित होते. BYTE : केशव उपाध्ये  - (  भाजप प्रवक्ते )Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.