ETV Bharat / state

मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांनी राजीनामा द्यावा... आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी - MLA prashant thakur in navi mumbai

भाजपा आमदार प्रशांत ठाकूर यांनी एसटी कर्मचाऱ्यांचे थकलेले पगार आणि अन्य मागण्यांसाठी महाविकास आघाडी सरकारचा निषेध नोंदवत मोर्चा काढला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

MLA prashant thakur in navi mumbai
मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांनी राजीनामा द्यावा... आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी
author img

By

Published : Nov 10, 2020, 6:08 PM IST

नवी मुंबई - महाविकास आघाडीने सतत जनतेची फसवणूक केली; निष्क्रिय कारभार केला. त्यामुळे स्वतःला राज्याचे कुटुंब प्रमुख म्हणवून घेणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच परिवहन मंत्री अनिल परब यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली आहे.

मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांनी राजीनामा द्यावा... आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी

एसटी महामंडळाचे पगार थकल्याने मनोज चौधरी व पांडुरंग गदडे या कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली. या दुर्दैवी आत्महत्येला महाविकास आघाडी सरकारचा निष्काळजीपणा कारणीभूत असून त्या विरोधात पनवेल एस.टी. स्थानकात भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली जाहीर निदर्शने करण्यात आली.

एसटीच्या कर्मचाऱ्यांना चार महिने पगार दिला नाही. त्यामुळे आमच्यातील सहकाऱ्याला आत्महत्या करावीशी वाटली. महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांना आधार देण्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचे कर्तव्य आहे. राज्याचे मुख्यमंत्री कुटुंब प्रमुख असल्याचे सांगतात. त्यांचीही जबाबदारी होती. मात्र ते हे करण्यात कुचकामी ठरले आहेत, असा आरोप ठाकूर यांनी केला आहे.

पुरोगामी महाराष्ट्राच्या संदर्भाने आपण अभिमानाने बोलतो. त्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये तीन पक्षांचे सरकार आहे. त्यातील दोन पक्ष वर्षानुवर्षे सत्तेत आहेत. तर एक पक्ष आता नव्याने नेतृत्व करतोय. त्यांना घोड्यावर बसवून बाकीचे लोक मजा बघत असून राज्यात सत्तेचा पोरखेळ चालला आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी ठाकरे सरकारवर केली.

अर्णब गोस्वामी प्रकरण

अर्णब गोस्वामीसारख्या पत्रकाराला आत्महत्येच्या नोटमध्ये नाव लिहिले, म्हणून थेट अटक केली. एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली. आत्महत्येच्या चिट्ठीमध्ये त्यांनी उद्धव ठाकरे आणि अनिल परब मृत्यूला जबाबदार असल्याचे नमूद केले. मग मुख्यमंत्री आज अनिल परब यांना अटक करणार का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. थोडी नैतिकता शिल्लक असल्यास अनिल परब यांचा राजीनामा घेणार का, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.

महाराष्ट्राच्या जनतेला निश्चितपणे एका कार्यक्षम सरकारची अपेक्षा आहे. या राज्याला सरकारकडून चांगल्या कारभाराची अपेक्षा आहे. मात्र महाविकास आघाडीकडून ती पूर्ण होताना दिसत नाही, असे सांगून ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.