ठाणे - एकीकडे नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला (CAA) कडाडून विरोध होत असताना दुसरीकडे या कायद्याचे समर्थन देखील केले जात आहे. ठाणे शहर सिंध समाजाच्यावतीने नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थानार्थ ठाणे पूर्व येथील कोपरी भागातील सिंध कॉलनीत समर्थन सभेचे आयोजन करण्यात आले होते.
हेही वाचा - मिनी बसमध्ये नाग शिरल्याने चालकासह प्रवाशांची उडाली भंबेरी
या सभेला पाकिस्तानातून भारतात स्थलांतरित झालेल्या आणि पिढ्यानपिढ्या ठाण्यातील कोपरी भागातील सिंधी कॉलोनीत वास्तव्यास असलेला सिंधी समाज उपस्थित होता.
भाजप आमदार संजय केळकर आणि भाजप ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत पसरत असलेले गैरसमज व या कायद्याविषयी माहिती देण्यात आली. यावेळी उपस्थित सिंधी समाजाने या कायद्याचे समर्थन करत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले.
हेही वाचा - ठाण्यात माजी नौदल अधिकाऱ्याचा जळालेल्या अवस्थेत आढळला मृतदेह