ETV Bharat / state

57 टक्के लोकांना कोरोना झाला आणि ठाकरेंना कळलेही नाही?

author img

By

Published : Aug 1, 2020, 9:30 PM IST

मुंबईत 57 टक्के लोकांना कोरोना होऊनही गेला आणि ठाकरे सरकारला ते कळलेच नाही. आता या लोकांच्या शरीरात अँटीबॉडी (प्रतिपिंडे) तयार झाल्याचे श्रेयही ठाकरे परिवार घेत आहे, अशा शब्दात सोमैया यांनी पुन्हा एकदा ठाकरे परिवारावर शाब्दिक हल्ला चढवला.

भाजप नेते किरीट सोमय्या
भाजप नेते किरीट सोमय्या

ठाणे - डोंबिवलीतील कोविड काळजी केंद्रांमध्ये दाखल असलेला रुग्ण बेपत्ता होऊन नंतर थेट खाडीत त्याचा मृतदेह सापडल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली होती. या मृत रुग्णाच्या कुटुंबीयांची भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमैया यांनी शनिवारी डोंबिवलीत भेट घेतली.

मुंबईत 57 टक्के लोकांना कोरोना होऊनही गेला आणि ठाकरे सरकारला ते कळलेच नाही. आता या लोकांच्या शरीरात अँटीबॉडी (प्रतिपिंडे) तयार झाल्याचे श्रेयही ठाकरे परिवार घेत आहे, अशा शब्दात सोमैया यांनी पुन्हा एकदा ठाकरे परिवारावर शाब्दिक हल्ला चढवला आहे. डोंबिवलीत पत्रकारांशी बोलताना सोमैया यांनी ही टीका केली.

पश्चिम डोंबिवलीच्या मोठा गाव-ठाकुर्लीतील शांताराम म्हात्रे चाळीत राहणारे रवी शंकर मोरे (53 वय) वै. हभप सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील स्व. सुरेंद्र वाजपेयी बंदीस्त क्रीडा संकुलातल्या कोरोना केंद्रातून 30 जुलै रोजी सकाळी बेपत्ता होऊन संध्याकाळी त्यांचा मृतदेह थेट पश्चिम डोंबिवलीतील मोठा गाव-ठाकुर्लीच्या खाडीत सापडल्याची घटना समोर आली होती. या मृत रुग्णाच्या कुटुंबाची शनिवारी सोमैया यांनी भेट घेतली.

नुकत्याच झालेल्या चाचण्यांमध्ये मुंबईत 57 टक्के लोकांच्या शरीरात कोरोनाच्या अँटिबॉडीज तयार झाल्याचे, म्हणजेच या लोकांना कोरोना होऊन गेल्याचे समोर आले आहे. यावरून टीका करताना आपल्याला मुंबईचे पालकमंत्री आणि मुंबई महापालिकेचे आयुक्त यांची लाज वाटत असल्याचे ते म्हणाले. तसेच या लोकांच्या शरीरात तयार झालेल्या अँटिबॉडीजचे श्रेयही आता ठाकरे परिवार घेत असल्याची टीका त्यांनी केली.

तर रवी मोरे हे डोंबिवली पश्चिमेच्या मोठागाव परिसरात वास्तव्याला होते. याच परिसराचे शिवसेना नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी प्रत्युत्तर देत सोमैयांना लक्ष्य केले. सोमैया यांनी नुकतीच ठाण्याच्या मनोरुग्णालयाची पाहणी केली. त्यांनी खरेतर तिथे चार दिवस राहून यायची गरज होती, असे ते म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.