ठाणे- दिव्यातील रस्त्यांच्या दुर्दशेकडे दुर्लक्ष केल्याने व खड्डे बुजवण्यासाठी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्यामुळे भाजप आक्रमक झाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप दिवा मंडळ अध्यक्ष अॅड. आदेश भगत आणि कार्यकर्त्यांनी आज दिवा प्रभाग समितीच्या बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता यांना प्रतिकात्मक डांबर भेट दिले.
दिवा शहरातील सर्वच अंतर्गत रस्ते व शहराला जोडणारे सर्व प्रमुख रस्त्यांना प्रचंड खड्डे पडले असून या रस्त्यांवरून चालणेसुद्धा कठीण झाले आहे. नुकतेच भाजप दिवा विभागाच्या वतीने दिव्यातील खराब रस्त्यांच्या विरुद्ध मोठा मोर्चा काढण्यात आला होता. परंतु, अजूनही दिव्यातील रस्ते जैसे-थेच आहेत.
ठाणे शहरात खड्डे बुजवण्यासाठी डांबर आणि सिमेंट काँक्रिटचा वापर केला जातो, तर दिवा शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी फक्त माती आणि खडी वापरली जाते. या विरुद्ध सर्व लोकप्रतिनिधी गप्प बसले आहेत. त्यामुळे, माती आणि खडी टाकून खड्डे बुजवण्याच्या पद्धतीविरुद्ध आपली नाराजी व्यक्त करत भाजप दिवा विभागाच्यावतीने अधिकाऱ्यांना प्रतिकात्मक डांबर भेट म्हणून देण्यात आले.
हेही वाचा- मीरा रोडमध्ये उद्यानाचे छप्पर कोसळले, सुदैवाने जीवितहानी नाही