ETV Bharat / state

ठाणे : भिवंडीत भाजपा नगरसेवकाची तक्रारदाराला मारहाण; घटना सीसीटीव्हीत कैद - ठाणे लेटेस्ट न्यूज

पालिकेचे पथक घटनास्थळी कंपाऊंडची भिंत तोडत असताना त्या ठिकाणी स्थानिक भाजपा नगरसेवक निलेश चौधरी आपल्या सहकाऱ्यांसोबत पोहचले. त्यानंतर त्या ठिकाणी उपस्थित तक्रारदार विनेश गुढका यांना शिवीगाळ व हाणामारीत केली.

भाजपा नगरसेवक
भाजपा नगरसेवक
author img

By

Published : Jun 15, 2021, 9:16 PM IST

Updated : Jun 15, 2021, 10:28 PM IST

ठाणे - भिवंडीत इमारत संकुलातील अनधिकृत बांधकामासह मोकळ्या जागेतील जैन मंदिरा संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करून पालिकेस कारवाई करण्यास भाग पाडणाऱ्या तक्रारदारास भाजपा नगरसेवकाने मारहाण केली. नगरसेवक निलेश चौधरी व त्यांच्या साथीदारांनी बेदम मारहाण करण्याची घटना समोर आली आहे. ही घटना सोमवारी भिवंडीतील अंजुरफाटा भागात घडली असून मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. विनेश कांतीलाल गुढका (वय 52) असे मारहाण झालेल्या तक्रादाराचे नाव आहे.

भाजपा नगरसेवकाची तक्रारदाराला मारहाण
अचानक झालेल्या मारहाणीमुळे तक्रारदार भयभीत

महावीर रेसिडेंसीमधील इमारतीमध्ये राहणारे विनेश गुढका यांनी बिल्डरने पालिका बांधकाम परवानगी शिवाय अधिक अतिक्रमण करून बांधकाम केल्या बाबतची तक्रार पालिकेकडे केली. त्याची शहानिशा करून या ठिकाणी कंपाऊंड भिंतीसह काही इमारतीमध्ये अतिरिक्त बांधकामा व मोकळ्या जागेत जैन मंदिर हे अनधिकृत बनविल्याचे निष्पन्न झाले. सोमवारी पालिकेचे पथक घटनास्थळी कंपाऊंडची भिंत तोडत असताना त्या ठिकाणी स्थानिक भाजपा नगरसेवक निलेश चौधरी आपल्या सहकाऱ्यांसोबत पोहचले. त्यानंतर त्या ठिकाणी उपस्थित तक्रारदार विनेश गुढका यांना शिवीगाळ व हाणामारीत केली. त्यामध्ये भाजपा नगरसेवक निलेश चौधरी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी विनेश गुढका याला बेदम मारहाण करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे तक्रादार भयभीत झाले आहे.

न्यायालयीन वाद विवाद

विनेश गुढका यांनी बिल्डर किशोर जैन यांच्याकडून महावीर कॉम्प्लेक्समध्ये एक सदनिका 2012 मध्ये खरेदी केली होती. परंतु तिचा ताबा मुदतीत न दिल्याने 2015 मध्ये फ्लॅटचा ताबा घेऊन त्यानंतर ग्राहक न्यायालयात बिल्डर विरोधात तक्रार केली. न्यायालयाने 12 लाख 25 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा निर्णय दिला होता. परंतु बिल्डरने आदेशानंतरही पैसे देण्यास नकार दिल्याने विनेश गुढका यांनी येथील अनधिकृत बांधकामा संदर्भात आवाज उठवला होता. त्याच रागातूनही मारहाण झाल्याचे बोलले जात आहे.

'जैन मंदिरास हात लावू देणार नाही'

आम्ही अनधिकृत बांधकामाचे समर्थन करीत नसून ही इमारत परवानगीमध्ये अधिकचे चटई क्षेत्र शिल्लक असताना बिल्डरने यातील सर्व रहिवाशी हलारी जैन समाजाचे असल्याने त्यांच्या मागणीनुसार जैन मंदिर बनविले आहे. तक्रारदार तक्रार मागे घेण्यासाठी बिल्डरकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न असल्याने त्याने ही तक्रार केली. परंतु आम्ही जैन समाज बांधवांच्या भावना जपण्याचे काम करीत असून जैन मंदिरास हात लावू न देण्यासाठी आपण लढणार असल्याचे भाजपा नगरसेवक निलेश चौधरी यांनी सांगितले आहे.

पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

या बाबत तक्रारदाराने नारपोली पोलिसांकडे तक्रार दिली असता पोलिसांनी भाजपा नगरसेवक निलेश चौधरी व त्यांच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी कोणालाही ताब्यात घेतले नाही.

हेही वाचा -नांदेडमध्ये खासगी अधिकाऱ्याला बंदुकीचे धाक दाखवत 57 हजारांनी लुटले

Last Updated : Jun 15, 2021, 10:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.