ETV Bharat / state

मीरा भाईंदर महापालिकेच्या सर्व प्रभाग समितीवर भाजपचा झेंडा - bjp

मीरा भाईंदर महापालिका प्रभाग समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे.सर्वच प्रभाग समितीमध्ये भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. प्रभाग समिती सभापतीपदाची निवडणूक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली.

Mira Bhayander Municipal Corporation
महापालिकेच्या प्रभाग समिती निवडणुकीमध्ये भाजपची बाजी
author img

By

Published : Oct 27, 2020, 6:53 PM IST

मीरा भाईंदर(ठाणे)- मीरा भाईंदर महापालिका प्रभाग समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे.सर्वच प्रभाग समितीमध्ये भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. प्रभाग समिती सभापतीपदाची निवडणूक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. या निवडणुकीत पीठासीन अधिकारी म्हणून मुंबईचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांनी काम पाहिले.

ऑनलाईन पध्दतीने पार पडलेल्या या निवडणुकीत प्रभाग समिती सभापती 2 आणि 6 चे भाजप उमेदवार बिनविरोध निवडूण आले, तर प्रभाग क्रमांक 1, 3, 4 आणि 5 साठी मतदान घेण्यात आले या सर्व जागेवर भाजपच्या उमेदवारांनी बाजी मारली.मीरा भाईंदर महानगरपालिकेवर भाजपची एकहाती सत्ता असून, आपला दबदबा कायम राखत सर्व प्रभाग समितीवर भाजपने आपला झेंडा फडकवला आहे.

महापालिकेत एकूण सहा प्रभाग समित्या आहेत, या मधील प्रभाग समिती दोनमधून रक्षा सतीश भूपतापी तर प्रभाग समिती सहा मधून सचिन केसरीनाथ म्हात्रे हे बिनविरोध निवडून आले आहेत. गेल्यावेळी सहापैकी एका प्रभाग समितीवर शिवसेनेच्या तारा घरत निवडून आल्या होत्या, मात्र या वेळेस शिवसेनेला एकही प्रभाग समिती राखण्यात यश आले नाही. प्रभाग एकमध्ये भाजपच्या वैशाली रकवी, प्रभाग तीनमध्ये भाजपच्या मीना कांगणे, प्रभाग समिती चारमध्ये भाजपचे दौलत गजरे, तर प्रभाग पाचमध्ये भाजपच्या हेतल परमार विजयी झाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.