ETV Bharat / state

भिवंडीत घातक केमिकल साठ्याच्या गोदामावर पोलिसांचा छापा; १७ लाखांचा साठा जप्त

भिवंडी तालुक्यात बेकायदा केमिकल गोदामांवर कारवाई करण्यात आली आहे. या गोदामात मोठ्या प्रमाणात केमिकलचा साठा करण्यात आला होता. यासाठी कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे या कारवाईत उघड झाले.

author img

By

Published : Nov 23, 2020, 5:30 PM IST

केमिकल साठ्याच्या गोदामावर पोलिसांचा छापा

ठाणे - भिवंडी तालुक्यातील पूर्णा येथील महालक्ष्मी वेअरहाऊस पटवर्धन कंपाउंड मधील एका गोदामावर नारपोली पोलिसांनी छापा मारला आहे. छापेमारीवेळी गोदामातून तब्बल १७ लाख ३५ हजार रुपये किमतीचा २८० कार्बोचे तसेच १४५ लोखंडी ड्रम असे विविध प्रकारचे अत्यंत ज्वलनशील केमिकलचा अवैध साठा केला असल्याचे आढळून आले. याप्रकरणी नारपोली पोलिसांनी हा संपूर्ण अवैध केमिकल साठा जप्त करून गुन्हा दाखल केला आहे. चंद्रकांत अण्णा देशमुख (वय, ५८ रा . नवी मुंबई) असे गुन्हा दाखल केलेल्या केमिकल माफियाचे नाव आहे.

महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचा दिखावा उघड-

भिवंडी तालुक्यात बेकायदा केमिकल गोदामांवर कारवाई करण्याचे निर्देश राज्याचे तत्कालीन पर्यावरमंत्री रामदास कदम यांनी दिले होते. मात्र भिवंडी महसूल विभागाकडून पर्यावरण मंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली गेल्याने राजरोसपणे अवैध केमिकल साठवणूक करत असल्याचे प्रकार वाढले आहेत. महसूल विभागाचे अधिकारी दिखाव्यापुरती थातुरमातुर कारवाया करून या अनधिकृत केमिकल माफियांना पाठीशी घालत असल्याचे चित्र या छापेमारीमुळे समोर आले आहे.

साठवणुकीसाठी कोणतीच परवानगी नाही-

विशेष म्हणजे भिवंडीतील खोणी मिठापाडा येथे अवैध केमिकलसाठा केलेल्या गोदामाला तीन दिवसांपूर्वी भीषण आग लागल्याची घटना घडली होती. यापूर्वीही अनधिकृत केमिकल गोदामांना लहान मोठ्या आगी लागल्याच्या घटना घडत असतांनाही महसूल विभाग व पोलीस प्रशासन झोपेचे सोंग घेत असल्याचा आरोप नागरिक करीत आहे. त्यातच भिवंडी तालुक्यातील पूर्णा गावातील महालक्ष्मी वेअरहाऊस पटवर्धन कंपाउंड मधील एका गोदामात बेकायदा केमिकल साठवणूक केल्याची खबर नारपोली पोलिसांना लागताच, या अवैध केमिकल गोदामावर छापा मारला असता, २८० कार्बोचे तसेच १४५ लोखंडी ड्रम असे विविध प्रकारचे अत्यंत ज्वलनशील केमिकलचा अवैध साठा केल्याचे आढळून आला.

या ड्रममधील सुमारे १७ लाख ३५ हजार रुपयांचे घातक केमिकल ड्रम जप्त करण्यात आले आहे. तर केमिकल साठवणुकीसाठी आवश्यक असलेली कोणतीही शासकीय परवानगी घेतली नसल्याचे पोलीस चौकशीत निष्पन्न झाले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक के. आर. पाटील करीत आहेत.

ज्वलनशील रासायनिक साठ्यामुळे भविष्यात जीवितहानी होण्याची शक्यता -

भिवंडी शहर व ग्रामीण परिसरात केमिकल गोदामांना आगी लागून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याच्या घटना नेहमीच घडत आहेत. त्यामुळे येथील केमिकल गोदामांवर कारवाई करण्याचे आदेश पर्यावरण मंत्रालयाने दिले होते. असे असतानाही भिवंडीत मोठ्या प्रमाणात अवैध केमिकल साठवणूक होत आहे. या अवैध केमिकल साठ्यांवर महसूल विभागाने व पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करणे गरजेचे असून भविष्यात या ज्वलनशील रासायनिक साठ्यामुळे एकादी मोठी दुर्घटना होवून नागरिकांची जीवितहानी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.