ETV Bharat / state

Thane Crime : अमंली पदार्थ तस्करीसह वाहने लंपास करणाऱ्या टोळीला भिवंडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या - ठाणे गुन्हेगारी

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात दोन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांतर्गत पोलीसांनी ९ गुन्ह्यांची उकल करत १० वाहनांसह ४ लाख ६० हजारांचा चरस गांजा जप्त करून सात गुन्हेगारांच्या टोळीला अटक ( Bhiwandi police arrested gang ) करण्यात आली आहे. याबाबची माहिती पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे ( DCP Navnath Dhawale ) यांनी दिली आहे.

Thane Crime
ठाणे गुन्हेगारी
author img

By

Published : Dec 13, 2022, 10:58 PM IST

पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे माहिती देताना

ठाणे : पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे ( DCP Navnath Dhawale ) यांनी नुकतेच गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ( Thane Crime ) सराईत गुन्हेगारांना हद्दपार केले असून परिमंडळातील सर्वच पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदारांना हद्दीत सतर्क गस्त करून गुन्हेगारीला प्रतिबंध लावण्यासाठी सक्त आदेश दिले. त्यानुसार भोईवाडा पोलीसांनी ३ गुन्हे उघडकीस आणून ४ मोटारसायकल जप्त करून एका सराईत चोरट्यास बेड्या ठोकल्या ( Bhiwandi police arrested gang ) आहेत. नफिज मोईनुद्दीन अन्सारी (मूळ रा.मालेगाव,नाशिक) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.

दीड लाख रूपये किमतीच्या 4 दुचक्या जप्त : भोईवाडा पोलीस ठाण्याचे वपोनि अंकुश बांगर यांना गुप्त बातमीदारामार्फत नफिज हा नाशिकहून भिवंडीत येवून दुचाकींची चोरी करून नाशिकला विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने आरोपीचा मोबाईलच्या लोकेशनच्या आधारे शोध घेऊन नाशिकहून सापळा रचून नफिज यास ताब्यात घेऊन अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने शहरातील गौरीपाडा येथून ४० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नाशिकला नेल्याची कबुली दिली. तसेच पोलिसांना दुचाकी चोरीचे आणखी काही घटना उघडकीस येण्याची शक्यता असल्याने आरोपीची अधिक पोलीस कोठडी न्यायालयाकडून मंजूर केली. आतापर्यत ३ दुचाकी चोरल्याची कबुली आरोपीने दिली. त्याच्याकडून १ लाख ६० रुपये किमतीच्या ४ दुचाक्या जप्त करण्यात आल्या.

वाहने जप्त : शांतीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक शंकर इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शैलेंद्र म्हात्रे व त्यांच्या पोलीस पथकाने जबीउल्ला इद्रिस अंसारी (रा.शांतीनगर,भिवंडी) यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे तपास केला असता, त्याच्याकडून ६ गुन्ह्यांच्या उकल करून १ लाख ८०हजार रुपये किमतीच्या ४ मोटारसायकलींसह २ ऑटो रिक्षा जप्त करून त्यास अटक केली आहे.

अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यास अटक : तसेच शांतीनगर पोलिसांनी चरस-गांजा या अंमली पदार्थांची बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्या हुनू कुमार विराना मिस्तरी (२९ रा.गायत्रीनगर,भिवंडी) याच्याकडून ५ किलो १०० ग्रॅम वजनाचा १ लाख ३ हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे. तसेच शफीक मिरासाहेब शेख (२६ रा.भिवंडी) याच्याकडून सुमारे ३५७ ग्रॅम वजनाचा ३ लाख ५७ हजार रुपये किमतीचा चरस जप्त केला असून या दोघांना अटक केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.