ETV Bharat / state

रायबरेलीतील विधवा पीडितेवर बलात्कार करणाऱ्या 'सलमान'ला भिवंडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या - शांतीनगर पोलीस कारवाई

रायबरेलीतील विधवा पीडितेवर बलात्कार करून फरार असलेल्या आरोपीला भिवंडी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी ताब्यात असल्याची माहिती मिळताच सलोन पोलीस ठाण्याचे एक पथक शांतीनगरमध्ये बुधवारी दाखल झाले असता आरोपी सलमानला त्यांच्या स्वाधीन केले.

crime
आरोपीला अटक
author img

By

Published : Oct 27, 2021, 10:17 PM IST

ठाणे - उत्तरप्रदेश राज्यातील रायबरेली हद्दीतील एका २६ वर्षीय विधवा पीडितेवर बळजबरीने बलात्कार करून आरोपी फरार झाला. तेव्हापासून युपीचे पोलीस त्याचा शोध घेत असतानाच रायबरेलीतील सलोन पोलिसांनी भिवंडी पोलिसांना आरोपीचा केवळ मोबाईल नंबर दिला. याच आधारावर शांतीनगर पोलिसांनी गैबीनगर परिसरातील एका लूम कारखान्याजवळ सापळा रचून त्याला अटक केली आहे. सलमान मो. शाह (वय २६ वर्ष ) असे अटक केलेल्या आरोपीच नाव आहे.

  • ठार मारण्याची धमकी देऊन पीडितेवर बलात्कार -

२६ वर्षीय पीडित विधवा उत्तरप्रदेश राज्यातील रायबरेली जिल्ह्यातील सलोन पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. तर आरोपीही याच परिसरात राहत असल्याने त्याची ओळख होती. त्यातच लॉकडाऊनपूर्वी पीडितेच्या पतीचे निधन झाल्याने याचा फायदा घेत आरोपी सलमानने तिच्याशी जवळकी साधत प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर दोघांमध्ये वर्षभर प्रेमसंबंध सुरु असतानाच गेल्यावर्षी तिला ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बळजबरीने बलात्कार करून पसार झाला. त्यावेळी याप्रकरणी सलोन पोलीस ठाण्यात भादवी कलम ३७६, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला.

हेही वाचा - पंढरपुरात अल्पवयीन मुलीवर सात दिवस आत्याचार, आमदार गोपीचंद पडळकर आक्रमक

  • युपी पोलीस दोन वर्षांपासून आरोपीच्या शोधात -

युपीमधील सलोन पोलिसांना २ वर्षांपासून आरोपीचा ठावठिकाणा लागत नव्हता. त्यातच सलोन पोलिसांना काही दिवसापूर्वीच आरोपी सलमानचा मोबाईल नंबर मिळाला असता, त्याचे मोबाईल लोकेशन भिवंडीत येत असल्याचे आढळून आले. त्यानंतर भिवंडी पोलिसांशी संपर्क करून आरोपीचा नंबर व वर्णन शांतीनगर पोलिसांना दिले. या आरोपीचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेळके, पोलीस हवलदार प्रसाद काकड, श्रीकांत पाटील या पथकाने आरोपीचा शोध सुरु केला.

  • सापळा रचून पोलिसांनी घेतले ताब्यात -

शांतीनगर पोलीस पथकाला दोन दिवसापूर्वीच आरोपी गैबीनगर भागातल्या एका लूममध्ये कामगार म्हणून काम करीत असल्याची माहिती बातमीदारामार्फत मिळाली. या माहितीच्या आधारे मोबाईल लोकेशन दाखवत असलेल्या लूम कारखान्याच्या परिसरात पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्यानंतर सलोन पोलीस ठाण्याशी संपर्क करून आरोपी ताब्यात असल्याची माहिती मिळताच सलोन पोलीस ठाण्याचे एक पथक शांतीनगरमध्ये बुधवारी दाखल झाले असता आरोपी सलमानला त्यांच्या स्वाधीन केले.

हेही वाचा - औरंगाबादेत 15 वर्षाच्या मुलाचा 5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.