ETV Bharat / state

Bhiwandi Hotel Robbery : हॉटेलचे शटर तोडून चोरट्याने गल्ला पळवला; घटना सीसीटीव्हीत कैद - भिवंडीत हॉटेलमध्ये चोरी

भिवंडी शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली ( Bhiwandi Robbery cases Increased ) आहे. त्यातच आता शहरातील मुक्कदर हॉटेलचे शटर तोडून चोरट्यांनी रोकडचा गल्ला पळवला आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.

Bhiwandi Hotel Robbery
Bhiwandi Hotel Robbery
author img

By

Published : Feb 4, 2022, 1:06 PM IST

Updated : Feb 5, 2022, 6:25 AM IST

ठाणे - भिवंडी शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली ( Bhiwandi Robbery cases Increased )आहे. त्यातच आता शहरातील मुक्कदर हॉटेलचे शटर तोडून चोरट्यांनी रोकडचा गल्ला पळवला ( Bhiwandi Hotel Robbery ) आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

हॉटेलचे शटर तोडून चोरट्याने पळवला गल्ला

कामगार झोपले होते

भिवंडीतील कणेरी भागात मुक्कदर हॉटेल आहे. ३० जानेवारीला पहाटे अडीच वाजल्याच्या सुमारास एका चोरट्याने हॉटेलचे शटर कश्याने तरी उचकटून आत प्रवेश केला. त्यावेळी हॉटेलमध्ये एक कामगार गाढ झोपल्याचे पाहून चोरट्याने गल्ल्यामधील सर्व रोकड खिशात टाकल्याचे सीसीटीव्ही फुटजेमध्ये दिसत आहे. मात्र,झोपलेला कामगार जागे होऊन आपण पकडले जाईल म्हणून या चोरट्याने रोकडचा गल्लाच पळवला. शिवाय त्या झोपलेले कामगाराचे घड्याळसह काही वस्तू चोरट्यांनी पळवल्या आहे. गल्ल्यात नेमकी किती रक्कम होती, याची माहिती मिळाली नाही. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, चोरट्यांचा शोध पोलीस घेत आहेत.

हेही वाचा - Bandatatya Karadkar Controversial Statement : बंडातात्या कराडकर सातारा पोलिसांच्या ताब्यात

Last Updated : Feb 5, 2022, 6:25 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.