ठाणे - भिवंडी महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना पाठिंबा देणारे रिपाई ऐक्यवादी (इंदोसे) गटाच्या नगरसेवकासह त्याच्या साथीदारावर शांतीनगर पोलीस ठाण्यात लाखोंची आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. दुसरीकडे गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच नगरसेवक फरार झाले होते. परंतू गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज बुधवारी साडेचारच्या सुमारास अटक केली. शरद नामदेव धुळे असे अटकेतील नगरसेवकाचे नाव आहे. तर तारीख शेख असे त्याच्या फरार साथीदाराचे नाव आहे. या अटक नगरसेवकाला न्यायालयात हजर केले असता 5 दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली.
गाळा देण्याच्या नावाने २२ लाखांची केली फसवणूक - भिवंडी - निजामपूर महानगरपालिका क्षेत्रातील गायत्रीनगर प्रभागाचे शरद धुळे हे नगरसेवक तथा सभापती आहेत. नगरसेवक धुळे व त्यांच्या साथीदाराने आपापसात संगनमत करून २०१४ साली तक्रारदार समरबहादूर यादव यांना भिवंडीतील नागांव परिसरतील निरा अपार्टमेंटमधील एका दुकान गाळ्यामध्ये गुंतवणुक करण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर दुकानाचा गाळा खरेदी करण्यास भाग पाडले. नगरसेवक शरद धुळे व त्याचा साथीदार तारिक शेख यांनी तक्रारदार समरबहादूर यांना गाळ्याचा ताबा न देता वेळोवेळी खरेदीखत करून देण्याच्या नावाने दिशाभुल करून त्यांच्याकडून २२ लाख रुपये घेतले. मात्र, बरेच वर्ष उलटूनही नगरसेवक व त्याच्या साथीदाराने दुकानाचा गाळा न देता किंवा पैसे परत न करता तक्रारदार यादव यांना फसवणूक केल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी (२६ एप्रिलला) शांतीनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन नगरसेवक धुळे व त्यांच्या साथीदार गुन्हा दाखल केला. त्यानंतर आज दुपारी साडेचारच्या सुमारास नगरसेवकास अटक करण्यास गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले.
भिवंडीत लाखोंची फसवणूक करणाऱ्या रिपाई ऐक्यवादीच्या नगरसेवकास अटक - भिवंडी रिपाई ऐक्यवादीच्या नगरसेवकास अटक
नगरसेवक शरद धुळे व त्याचा साथीदार तारिक शेख यांनी तक्रारदार समरबहादूर यांना गाळ्याचा ताबा न देता वेळोवेळी खरेदीखत करून देण्याच्या नावाने दिशाभुल करून त्यांच्याकडून २२ लाख रुपये घेतले. मात्र, बरेच वर्ष उलटूनही नगरसेवक व त्याच्या साथीदाराने दुकानाचा गाळा न देता किंवा पैसे परत न करता तक्रारदार यादव यांना फसवणूक केल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी (२६ एप्रिलला) शांतीनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन नगरसेवक धुळे व त्यांच्या साथीदार गुन्हा दाखल केला. त्यानंतर आज दुपारी साडेचारच्या सुमारास नगरसेवकास अटक करण्यास गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले.