ETV Bharat / state

भिवंडी महापालिकेच्या तिजोरीची चावी काँग्रेसकडे

काँग्रेसचे 18 नगरसेवक फोडून कोणार्क आघाडीने महापौर पद भाजपच्या पाठिंब्यावर पटकावले होते. तर काँग्रेसचे फुटीर गटाचे नगरसेवक इम्रान खान उपमहापौरपदी निवडून आले. त्यामुळे याही निवडणुकीत काँग्रेसला पराभवाची भीती होती. मात्र, स्थायी समितीच्या सभापती पदावर काँग्रेस-शिवसेना आघाडीचे शिक्कामोर्तब झाले.

bhivandi-muncipal-corporation
भिवंडी महापालिकेच्या तिजोरीची चावी काँग्रेसकडे
author img

By

Published : Dec 24, 2019, 9:09 AM IST

ठाणे - भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेची तिजोरी समजण्यात येणाऱ्या स्थायी समिती सभापतीची निवणूक आज (सोमवारी) पार पडली. यामध्ये काँग्रेसचे मोहमद हलीम अन्सारी यांची स्थायी समिती सभापतीपदी निवड झाली आहे. त्यामुळे पालिकेची तिजोरीची चावी काँग्रेस-शिवसेना आघाडीकडे गेली आहे. याचाच परिणाम म्हणून महापौर असलेल्या कोणार्क-भाजप युतीची पंचायत होऊन बसली आहे.

भिवंडी महापालिकेच्या तिजोरीची चावी काँग्रेसकडे

हेही वाचा - झारखंडही भाजपच्या हातून निसटलं.. रघुवर दास यांनी राज्यपालांना सोपवला राजीनामा

काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे 18 नगरसेवक फोडून कोणार्क आघाडीने महापौर पद भाजपच्या पाठिंब्यावर पटकावले होते. तर काँग्रेसचे फुटीर गटाचे नगरसेवक इम्रान खान उपमहापौरपदी निवडून आले. त्यामुळे याही निवडणुकीत काँग्रेसला पराभवाची भीती होती. मात्र, ऐनवेळी फुटीर काँग्रेस गटाचे नगरसेवक इम्रान खान तर भाजपचे सुमित पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे स्थायी समिती कँग्रेसचे हालीम अन्सारी यांची सभापती म्हणून बिनविरोध निवड झाली. पीठासीन अधिकारी डॉ. राजेश नार्वेकर व आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी हलीम अन्सारी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. हालीम अन्सारी सभापती यांची निवड झाल्यावर लगेच त्यांनी मावळते सभापती मदन (बुवा) नाईक यांच्याकडून स्थायी समिती सभापतीपदाचा कार्यभार स्वीकारून कामाला सुरुवात केली. यावेळी जिल्हा नगरपालिका प्रशासन अधिकारी प्रकाश बोरसे, उपायुक्त दीपक कुरुळेकर, नगरसचिव अनिल प्रधान, जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले, उपस्थित होते.

स्थायी समितीमध्ये एकूण 16 सदस्य असून त्यामध्ये काँग्रेसचे 8, भाजप 4 , शिवसेना 2, कोणार्क 1 ,सपा 1 अशी पक्षनिहाय सदस्य संख्या आहे. नुकत्याच पार पडलेल्या महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणूकीत काँग्रेसचे 18 नगरसेवक फुटल्याने काँग्रेसला सत्ता गमवावी लागल्याने मोठा धक्का बसला होता. विशेष म्हणजे काँग्रेसच्या 18 फुटीर नगरसेवकांमध्ये 4 नगरसेवक स्थायी समितीचे सदस्य आहेत. त्यामुळे हे सदस्य भाजप उमेदवार सुमित पाटील यांच्या गोटात गेल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आज पार पडलेल्या निवडणुकीत भाजपने माघार घेतल्याने अखेर ही अफवाच ठरली.

हेही वाचा - 'झारखंडमध्ये भाजपच्या जनविरोधी धोरणांचा पराभव'

Intro:kit 319Body:भिवंडी महापालिकेची तिजोरीची चावी कॉग्रेसकडे ; कोणार्क -भाजपयुतीची पंचायत

ठाणे : भिवंडी निजामपूर शहर महानगर पालिकेची तिजोरी समजण्यात येणाऱ्या स्थायी समिती सभापतीची निवणूक आज पार पडली. यामध्ये कॉग्रेसचे मोहमद हलीम मो.हरून अन्सारी यांची स्थायी समिती सभापतीपदी निवड झाल्याचे तिजोरीची चावी कॉग्रेस- शिवसेना आघाडीकडे गेली. त्यामुळे महापौर असलेल्या कोणार्क - भाजप युतीची पंचायत होवून बसली आहे.

विशेष म्हणजे काही दिवसापूर्वीच कॉग्रेसचे १८ नगरसेवक फोडून कोणार्क आघाडीने महापौर पद भाजपच्या पाठींब्यावर पटकावले होते. तर कॉग्रेसचे फुटीर गटाचे नगरसेवक इम्रान खान उपमहापौर पदी निवडून आले. त्यामुळे याही निवडणुकीत कॉग्रेसला पराभवाची भीती होती. मात्र ऐनवेळी फुटीर काँग्रेस गटाचे नगरसेवक इम्रान खान तर भाजपचे सुमित पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे स्थायी समिती कॉग्रेसचे हालीम अन्सारी यांची सभापती म्हणून बिनविरोध निवड झाल्यावर पीठासीन अधिकारी डॉ. राजेश नार्वेकर व आयुक्त डॉ.प्रवीण आष्टीकर यांनी हलीम अन्सारी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. हालीम अन्सारी सभापती यांची निवड झाल्यावर लगेच त्यांनी मावळते सभापती मदन (बुवा) नाईक यांचेकडून स्थायी समिती सभापतीपदाचा कार्यभार स्वीकारून कामाला सुरुवात केली. यावेळी जिल्हा नगरपालिका प्रशासन अधिकारी प्रकाश बोरसे, उपायुक्त दीपक कुरुळेकर, नगरसचिव अनिल प्रधान, जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले,उपस्थित होते.
स्थायी समितीमध्ये एकूण १६ सदस्य असून त्यामध्ये काँग्रेसचे ८ ,भाजप ४ ,शिवसेना २ ,कोणार्क १ ,सपा १ अशी पक्षनिहाय सदस्य संख्या आहे. नुकत्याच पार पडलेल्या महापौर,उपमहापौर पदाच्या निवडणूकीत काँग्रेसचे १८ नगरसेवक फुटल्याने काँग्रेसला सत्ता गमावी लागल्याने मोठा धक्का बसला होता. विशेष म्हणजे कॉग्रेसच्या १८ फुटीर नगरसेवकांमध्ये ४ नगरसेवक स्थायी समितीचे सदस्य आहेत. त्यामुळे हे सदस्य भाजप उमेदवार सुमित पाटील यांच्या गोटात गेल्याचे सांगण्यात आले होते. मात्र आज पार पडलेल्या निवडणुकीत भाजपने माघार घेतल्याने अखेर ही अफवाच ठरली.
         
Conclusion:bhiwandi
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.