ठाणे - घरोघरी गौरींचे उत्साहात स्वागत करण्यात आले. गौरीला म्हणजे लक्ष्मी घरात आली की, तिला खुश करण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न केले जातात. विविध प्रकारचे नैवेद्य आणि सजावट करुन गौरीपूजन स्थळ सजवले जाते.
ठाण्यातील अर्चना मांढरे या तरूणीने भातुकलीच्या खेळणीची सजावट करुन गौरीची सजावट केली आहे. गौरीच्या सजावटीमध्ये खेळणी सोबतच खाण्याचे विविध पदार्थही मांडण्यात आले आहेत. अतिशय मनमोहक आणि सुंदर अशा भातुकलीच्या खेळण्यांची मांडणी करून गौरींच्या लहानपणीच्या आठवणी जागवल्या आहेत.
हेही वाचा -ठाण्यात 'वाचाल तर वाचाल' असा संदेश देणारे बाप्पाची स्थापना
गौरी सजावटीमध्ये मांडण्यात आलेली खेळणी -
भांडी मांडणीचे कपाट, पितळीची विळी, पोळ पाट लाटणे, पितळेचा डायनिंग टेबल, परात, पातेली, डबे, कुकर, इडलीचे भांडे, किटली, चमच्यांचा सेट, बादली, स्टोव्ह, पाणी तापवायचा बंब, कढई, हंडा, कळशी, टाकी, मिक्सर.
गौरी सजावटीमध्ये मांडण्यात आलेले खाण्याचे पदार्थ -
गोळ्या, काजू बिस्कीटे, क्रिमची कार्टून आकाराची बिस्किटे, काजू, बदाम, मनुके, चकली, डिंक-रवा-बुंदीचे लाडू, चार प्रकारच्या तिखट गोड शेव, गुलाबजाम, चहा, अळूवडी.