ETV Bharat / state

पतपेढी व्यवस्थापकाची गळफास घेत कार्यालयातच आत्महत्या; ठाण्यातील ठाकुर्ली येथील घटना - YOGESH AAROTE SUICIDE NEWS

सहकार मित्र मधुकर सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई शाखेच्या व्यवस्थापकाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली.

डोंबिवली पोलीस ठाणे
डोंबिवली पोलीस ठाणे
author img

By

Published : Oct 3, 2020, 5:43 PM IST

ठाणे - ठाकुर्लीतील सहकार मित्र मधुकर सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई शाखेच्या व्यवस्थापकाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. शनिवारी सकाळच्या सुमारास कार्यालयातच गळफास घेतला. पोलिसांना घटनास्थळावरून सुसाईड नोट मिळाली आहे. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी अधिक तपास सुरु केला आहे.

योगेश आरोटे (वय 44) असे आत्महत्या करणाऱ्या पतपेढी व्यवस्थापकाचे नाव आहे. मृतक योगेश हे डोंबिवलीतील हनुमान मंदिराजवळील नवनंदा सोसायटीमध्ये रहात होते. त्यांची ठाकुर्ली येथेच बुटाजी टॉवरमध्ये तळमजल्यावर मधुकर सहकारी पतपेढीची शाखा आहे. शनिवारी सकाळी पतपेढीतील लिपीक अमित चौधरी हे कार्यालयात आले असता त्यांना बैठकीच्या खोलीत योगेश यांनी आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. त्यांनी याविषयीची माहिती रामनगर पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक मनोहर घाडगे व त्यांचे पथक घटनास्थळी रवाना झाले. योगेश यांच्या खिशात सुसाईड नोट सापडली असून त्यामध्ये त्यांनी मी स्वतः माझे जीवन संपवत असून यासाठी कोणीही दोषी नसल्याचे लिहीले आहे. योगेश यांचा मृतदेह रुक्मिणीबाई येथे पाठविण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.