ठाणे : 'आग पोरी तू स्वप्नात येना' या गाण्यामुळे अल्पवधीतच युट्युबवर फेमस (Balya singer of Aag Pori Tu Swapnat Yena fame died while fishing) असलेल्या बाळ्या सिंगर उर्फ बाळा रतन दिवे या आदिवासी गायकाचा मासेमारी करताना नदी पात्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना शहापूर तालुक्यातील पळसपाडा गावाच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. Balya singer died
आदिवासी समाजातील बाळ्या सिंगर उर्फ बाळा हा आपल्या गाण्याच्या आवाजाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. मृत बाळा सिंगार पत्नी आणि चार मुलांसह शहापूर तालुक्यातील आसनगाव नजीक असलेल्या वालसेत गावातील आदिवासी पाड्यात राहात होता. कुटुबांची उपजीविका चालविण्यासाठी मासेमारी, तर कधी वीटभट्टीवर मोलमजुरी करीत होता. वयाच्या १२ वर्षापासूनच त्याला गाणे गायकाची आवड निर्माण झाली होती. त्यासाठी त्याच्या आईने त्याला विविध आगरी, कोळी, आदिवासी गाण्याच्या कॅसेटसह टेपरोकॉर्ड घेऊन दिला होता. तेव्हापासून शहापूर तालुक्यातील बाळ्या सिंगर अशी ओळख त्याची निर्माण झाली होती.
बाळ्या सिंगर शहापूर तालुक्यात नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्याला ज्याने आपल्या आवाजाने सर्वांना भूरळ घातली होती. तो एका आदिवासी कुटुंबांचा मासेमारी करणारा बाळ्या ऊर्फ बाळ्या सिंगर मासे विक्रीसाठी गावागावात जाऊन गाणे म्हणत आपल्या गोड आवाजाने ग्राहकांना भूरळ घालीत असे, क्रिकेटचे सामने आसो कि काही कार्यक्रम बाळ्या सिंगरला आवर्जून आयोजक बोलवत होते. अशा एक आदिवासी तरूणांचा शहापूर तालुक्यातील पळसपाडा येथील नदीत मासेमारी करत असताना २७ ऑक्टोंबर रोजी पाण्यात पडून बुडून त्याचा मृत्यू झाला आहे. त्याच्या मृत्यूने शहापूर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे रोजगाराची चिंता न मिटल्याने त्याला आपला जीव गमवावा लागल्याची खंत त्याच्या हजारो चाहते व्यक्त करीत आहे. आदिवासी समाजातील एक हुन्नरी कलाकार गेल्याची खंत व्यक्त होत आहे. Balya singer died