ETV Bharat / state

Badlapur Car Driver Robbed : अंत्ययात्रेला जाण्याच्या बहाण्यानं चालकाला लुटून पळविली ओला कार, 6 अज्ञात प्रवाशांवर गुन्हा - उल्हासनगर गुन्हे शाखेचे पथक

Badlapur Car Driver Robbed : अंत्यात्रेला जाण्याच्या बहाण्यानं ओला कार बुक करत चालकाला निर्जनस्थळी नेत मारहाण करुन लुटून ओला कार पळवल्याची घटना बदलापूर पश्चिम भागात उघडकीस आलीय. याप्रकरणी कार चालकाच्या तक्रारीवरून अज्ञात 6 प्रवाशांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Badlapur Car Driver Robbed
Badlapur Car Driver Robbed
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 28, 2023, 9:20 PM IST

ठाणे Badlapur Car Driver Robbed : अंत्ययात्रेला जाण्याच्या बहाण्यानं ओला कार बुक करून निर्जनस्थळी नेत चालकाला मारहाण करत लुटून त्याची ओला कार पळवल्याची घटना समोर आलीय. ही घटना बदलापूर पश्चिम भागातील निर्जनस्थळ असलेल्या उल्हासनदी जवळ घडलीय. याप्रकरणी ओला चालकाच्या तक्रारीवरून ६ भामट्या प्रवाशांवर विविध कलमानुसार बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी भामट्यांच शोध सुरू केलाय.

मारहाण करत चालकाला लुटले : याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अब्दुल सईद राईन (वय ३८) हे नालासोपारा पूर्व भागातील पेल्हार परिसरात कुटूंबासह राहतात. ते ओला कार चालक असून २७ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास बदलापूर पश्चिम भागातील एका पेट्रोलपंपावर कारसह उभे होते. एका अनोखळी मोबाईल नंबरवरून इच्छित स्थळी जाण्यासाठी भामट्यानं ओला बुक केली. त्यानंतर चालक त्या भामट्याच्या मोबाईल लोकेशनवर पोहोचले. मात्र, त्या भामट्यासोबत त्याचे इतर पाच साथीदारही त्याठिकाणी हजर होते. त्यानंतर आम्हाला लवकर अंतयात्रेला जायचं असा बहाणा करत हे सहा भामटे ओला कारमध्ये बसले. ओला कार काही वेळानं बदलापूर पश्चिम भागातील निर्जनस्थळ असलेल्या उल्हासनदी जवळील रस्त्यावर येताच कारमध्ये बसलेल्या भामट्यांनी चालक अब्दुलला लोखंडी रॉडने मारहाण करत धमकी देऊन त्याच्या जवळील रोख रक्कम आणि दोन मोबाईल तसेच त्याची ओला कार असा ८ लाख ११ हजार ५०० रुपयांच्या मुद्देमाल घेऊन पळून गेले.

सहा भामट्यांवर गुन्हा दाखल : दरम्यान, या घटनेनंतर चालक अब्दुलने बदलापूर पश्चिम पोलीस ठाणे गाठत घडलेली घटना पोलीस अधिकाऱ्यांना सांगितली. पोलीसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून चालक अब्दुलच्या तक्रारीवरून कार घेऊन पळालेल्या सहा भामट्या प्रवाशांवर भादंवि कलम ३९५, ३९७ प्रमाणे गुन्हा दाखल केला. या भामट्यांचा शोध घेण्यासाठी २ पोलीस पथकासह उल्हासनगर गुन्हे शाखेचे पथक रवाना झाले असून घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे लवकरच हे आरोपी पकडले जातील असं पोलीसांनी सांगितलंय. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक थेरवे करत आहेत.

हेही वाचा :

  1. Robbers Gang Arrested In Thane : दरोडा टाकण्याआधीच सहा दरोडेखोरांना फिल्मी स्टाईलने अटक
  2. Thane Crime News : अंबरनाथ -बदलापूर मार्गावरील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, दलालासह दोघांना बेड्या
  3. Thane Crime : लहान भावाच्या भांडणात मध्यस्थी बेतली मोठ्या भावाच्या जीवावर; छातीत कोपरखळी मारून खून

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.