ठाणे - झोपलेल्या सुरक्षा रक्षकावर अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना कल्याण पूर्वेतील मलंगरोडवरील असलेल्या एका गॅरेजबाहेर घडली आहे. विशेष म्हणजे प्राणघातक हल्ल्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. निलेश घोष (वय 25 वर्षे), असे सुरक्षा रक्षाकाचे नाव असून त्याच्यावर मुंबईतील सायन रुग्णालयात उपचार सुरू आहे.
सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू
कल्याण-मलंग रोडवरील एका पेट्रोल पंपा समोरील एका गॅरेजच्या बाहेर निलेश हा सुरक्षा रक्षक मंगळवारी (दि. 10 ऑगस्ट) पहाटेच्या सुमारास एका लाकड्याचा बाकावर रात्री झोपला होता. त्यावेळी 3 ते 4 अज्ञात जणांनी एकत्र जमून निलेशच्या डोक्यावर आणि पायावर जीवघेणा हल्ला करून तेथून पळून गेले. या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे. जखमी निलेशवर मुंबईतील सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मानपाडा पोलीस सीसीटीव्हीच्या सहायाने निलेशला मारहाण करणाऱ्या आरोपींचा शोध घेत आहेत. दरम्यान, हा हल्ल्याचे नेमके कारण काय होते याचा तपास सुरू असल्याचे मानपाडा पोलीसांनी सांगितले.
हेही वाचा - कल्याणात शिवसैनिक-भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा; भाजपचे कार्यालयही फोडले