ETV Bharat / state

राज्यातील सरकार हे विद्यार्थीद्रोही - आशिष शेलार

author img

By

Published : Jun 15, 2020, 5:58 PM IST

भाजप आमदार आशिष शेलार हे पक्षाच्या कामानिमित्त ठाण्यात आले होते. तेव्हा त्यांनी पत्रकारांशी बातचीत करताना हे घणाघाती आरोप राज्य सरकारवर केले.

आशिष शेलार
आशिष शेलार

ठाणे - राज्यातील सरकार हे विद्यार्थीद्रोही सरकार आहे. जवळपास साडेतीन लाख एटीकेटी आणि रिपीटर विद्यार्थ्यांना नापास करण्याचे पाप हे सरकार करत आहे. निर्णय जाहीर केल्यानंतर आता त्याच्यावर अभ्यास हे सरकार करतेय, असा घणाघात भाजप आमदार आशिष शेलार यांनी केला. ते ठाण्यात बोलत होते.

भाजप आमदार आशिष शेलार हे पक्षाच्या कामानिमित्त ठाण्यात आले होते. तेव्हा त्यांनी पत्रकारांशी बातचीत करताना हे घणाघाती आरोप राज्य सरकारवर केले. राज्याच्या जनतेच्या हिताच्या मागण्या 'जोगवा मागणे' म्हणजे विरोध असा चष्मा सत्ताधाऱ्यांनी घातला आहे. तो त्यांनी काढावा, असा आरोप करत केंद्रावर तोंडसुख घेताना राज्यात काय सुरू आहे, याबाबत स्वत:चे ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे बघायचे वाकून, असा शाब्दिक हल्ला शेलार यांनी सत्ताधाऱ्यांवर केला आहे. ॲानलाईन शिक्षण ही काळाची गरज आहे. हे खरं असले तरीही ॲानलाईन शिक्षणाबाबत राज्य सरकारने जो निर्णय घेतला आहे, त्याबाबत सर्वांचे विचार जाणून निर्णय घ्यावा, अशी सुचना शेलार यांनी राज्य सरकारला दिली आहे.

ठाण्यातील दोन मंत्री एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावरही शेलार यांनी चांगलीच टिकाटिप्पणी केली आहे. ठाण्यात जर वेळेत उपचार मिळाले नाही म्हणून लोकांचे मृत्यू होतायेत तर ठाण्याचे पालकमंत्री बदलणार का? हा असा सवाल शेलार यांनी केला. तर, झोपडपट्टी पुर्नविकास योजनेमध्ये प्रथमोपचार केंद्र म्हणून ५ हजार स्क्वेअर फुटाचे भूखंड देणार, हा बदल गृहनिर्माण मंत्र्यांना करता येत नाही, असा टोला शेलार यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना लगावला आहे.

दुसराकीडे नगरविकास मंत्र्यांनी युडीसीआरमध्ये बदल करून सुविधा केंद्राच्या जागा खाऊन टाकण्याचे काम सुरू आहे, असा गंभीर आरोप त्यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला आहे. याच पार्श्वभूमीवर ठाण्यातील दोन्ही मंत्री विकासकांची वाटेमारी करत लोकांना भूलथापा देत आहेत असं करू नये, असं आमचं आवाहन आहे, असं शेलार बोलले. मुंबई आणि ठाण्यातील नाले सफाईबाबतही शेलार यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.