ठाणे - ठाण्यातील खाडी परिसरात देशविदेशातील विविध पक्ष्यांचे आगमन ( Arrival of various birds from abroad ) होत असते. त्यात प्लेंमिगो पक्षांचे ( Flamingo Bird ) आगमन पर्यटकांसाठी पर्वणीच ठरत ( Tourists flock to see flamingos ) आहे. हिवाळ्याची सुरुवात झाली की अनेक परदेशीय पाहुणे ठाणे खाडीत भेटीसाठी येत असतात. हे पाहुणे जवळपास हजारो मैल दूर प्रवास करून येत असून लाखोंच्या संख्येने आपल्याला ठाणे शहरालगत असलेल्या खाडीमध्ये पाहण्यास मिळत आहे.
विविध पक्षी दाखल - अनेक वेळा फ्लेमिंगो पक्षी आपल्याला परदेशात पहायला मिळतात. तर थंड हवेच्या ठिकाणी राहणे हे पक्षी पसंत करतात. प्रत्येक वर्षी हिवाळाच्या सुरुवातीला असंख्य फ्लेमिंगो पक्षी देशात विविध ठिकाणी दाखल होत असतात. या फ्लेमिंगो पक्षांसोबत 200 हून अधिक विविध जातींचे पक्षी हे खाडीकिनारी आढळून येतात.
फ्लेमिंगो पक्षांना पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी - फ्लेमिंगो पक्षी यांना योग्य प्रमाणात खाद्यपदार्थ या खाडीकिनारी मिळत असून हे पक्षी प्रामुख्याने याच ठाणे खाडी किनाऱ्यात आढळतात. तर चार ते पाच महिन्याचा वास्तव्य त्यांचे या खाडी किनारी असते. याच पाहुण्यांना पाहण्यासाठी अनेक पर्यटक हे या ठिकाणी येत असतात. फ्लेमिंगो पक्षांचा रंग त्यांचा आकार त्यांचे उडण्याची पद्धत विशेषतः सर्वच गोष्टी या पर्यटकांना मनमोहक असा आनंद देतात. त्याच खाडी परिसरात विहार करणाना प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळत आहे.
ठाण्यातील खाडीच आकर्षण केंद्र - ठाणे शहरात, खाडी परिसरात या हिवाळ्याच्या काळात फ्लेमिंगो, सीगल आणखीन इतर विदेशी पाहुणे थंड वातावरणामुळे येतात. त्यामुळे ही खाडी पक्षीप्रेमींना आनंद देते. अनेकदा विदेशी पर्यटक या ठिकाणी अभ्यास करण्यासाठी या भागात येतात. सरकारने याच बाबीला विशेष महत्त्व दिले असून खास फ्लेमिंगो पार्क देखील उभारले आहे.