मुंबई : वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून घाटकोपर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. बदली होऊनही रिलीज ऑर्डर मिळत नसल्याने पोलीस निरीक्षकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान आत्महत्या करणाऱ्या पोलीस निरीक्षकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आधी अधिकाऱ्याला वाचवणार मग तपास : मुंबईचे सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी यांनी सांगितले की, अधिकाऱ्याला वाचवणे हा आमचा पहिला उद्देश आहे, त्यानंतर त्याने हे पाऊल का उचलले याचा तपास केला जाईल. पुढील तपास पोलीस उपायुक्त (झोन-7) पुरुषोत्तम कराड हे करत आहेत. बदली झाल्यानंतरही पदमुक्त न केल्याने अधिकाऱ्याने हे कठोर पाऊल उचलल्याचे आतापर्यंतच्या तपासात उघड झाले आहे, असे ते म्हणाले. तपास सुरू असून त्यानंतरच सर्व काही स्पष्ट होईल.
का संपवणार होते आयुष्य : पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस निरीक्षकाचे नाव बाळकृष्ण नाणेकर आहे. ते 108 तुकडीचे अधिकारी असून पाच वर्षांपूर्वी त्यांची पुण्यात बदली झाली होती, पण तरीही त्यांना सोडले जात नव्हते. त्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलले आहे. विशेष म्हणजे असे अनेक पोलीस अधिकारी आहेत. ज्यांना त्यांच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या कार्यालयातून बदलीनंतर रिलीझ ऑर्डरसाठी अडकवून ठेवले जाते आणि हे केवळ नवीन पोस्टिंगसाठी नाही तर काही वर्ष कर्तव्य बजावलेल्या अधिकाऱ्यांबाबत असेच वागणूक मिळते. यामुळे अनेकांना त्यांच्या कुटंबीय समस्या उद्भवत असतात. बदली होणार म्हणून काही अधिकारी त्यांच्या मुलांचे शालेय प्रमाणपत्र काढून घेतात. पण बदलीच्या ठिकाणी सोडले जात नसल्याने पाल्यांचे भविष्य धोक्यात येत असते. दरम्यान संबंधित अधिकारी नाणेकरसह होऊनही 55 अधिकाऱ्यांची बदली होऊन पाच महिने झाले आहेत. तरीही त्यांची अजून पोस्टिंग झालेली नाही. रिलीझ ऑर्डर मिळत नसल्याने अधिकाऱ्यांना मुलांच्या भवितव्याची चिंता सतावत आहे.
अधिकारी पोस्टिंगच्या प्रतीक्षेत : पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, घाटकोपर पोलीस ठाण्यातील ही पहिलीच घटना नाही. याआधीही अनेक महिला व पुरुष अधिकाऱ्यांनी आपल्या वरिष्ठांवर छेडछाडीचे आणि असभ्य भाषेचा वापर केल्याचा आरोप केला होता. त्या झोनच्या पोलीस उपायुक्तांनाही कळविले आहे. 9 डिसेंबर 2022ला राज्यातील इतर शहरे आणि जिल्ह्यांमधून 109 सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या (एपीआय) बदल्या करण्यात आल्या. ज्यामध्ये असे 55 अधिकारी आहेत, जे बदली होऊनही गेल्या पाच महिन्यांपासून त्यांच्या पोस्टिंगच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु त्यांना सोडण्यात आले नाही. एपीआय बाळकृष्ण नाणेकर हे देखील त्यापैकीच एक आहेत.
बोलण्यास अधिकाऱ्याची टाळाटाळ : विश्वसनीय पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 2 मे रोजी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयातून रिलीज ऑर्डर मिळाल्यानंतर नाणेकर हे त्यांच्या वरिष्ठ अधिकार्यांकडून रिलीज ऑर्डर घेण्यासाठी गेले होते. तेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्याने स्वतःची बदली झाली आहे, असे सांगून त्यांना रिलीज ऑर्डर देण्यास नकार दिला. या संदर्भात घाटकोपर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय डहाके यांच्याशी पत्रकाराने संपर्क साधला असता त्यांनी मीटिंगमध्ये असल्याचे सांगून फोन बंद केला.
हेही वाचा -