मीरा भाईंदर ( ठाणे ) - काशीमीरा पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र भांबरे यांना 25 हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस ठाण्यातच रंगेहात अटक केली आहे.
तक्रारदारावर दीड वर्षांपूर्वी 376 चा गुन्हा काशीमीरा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात दोषाआरोप न्यायालयात सादर करायचे आहे. आपण मला फ्लॅट, पैसे द्या, अशी मागणी पोलीस अधिकारी महेंद्र भांबरे यांनी तक्रारदाराकडे केली होती. याबाबत तक्रारदारांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. गुरुवारी सापळा रचून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात 25 हजार घेताना ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा - Handicap Three wheeler : ठाण्यातील 17 वर्षाच्या भाविकने बनवली अनोखी तीन चाकी गाडी, अपंगांना होणार मदत