ETV Bharat / state

अण्णाभाऊ साठे जयंतीचा निधी पूरग्रस्तांना, जयंती उत्सव समितीचा निर्णय - अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीचा

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 99 वी सुवर्ण महोत्सवी जयंती सोहळा साजरा करण्यात येणार होता. परंतु महाराष्ट्रावर महापुराचे संकट आले असताना माणुसकीच्या दृष्टीकोनातून समितीने हा निर्णय घेतला आहे, असे अण्णाभाऊ साठे उत्सव समितीचे अध्यक्ष दीपक आवारे यांनी म्हटले आहे.

अण्णाभाऊ साठे जयंतीचा निधी पूरग्रस्तांना, जयंती उत्सव समितीचा निर्णय
author img

By

Published : Aug 14, 2019, 9:58 AM IST

ठाणे - महापुराचे संकट ओढवलेल्या कोल्हापूर-सांगली जिल्ह्यांतील पूरग्रस्तांना मदतीसाठी अनेक सामाजिक संघटना पुढे येऊ लागल्या आहेत. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सार्वजनिक उत्सव समितीनेदेखील या पूरग्रस्तांना मदतीचा हात पुढे केला आहे. अण्णाभाऊ साठे यांची यंदाची जयंती रद्द करण्यात आली असून महोत्सवाला लागणारा संपूर्ण खर्च पूरग्रस्तांना गृहोपयोगी वस्तूंच्या स्वरूपात देण्यात येणार असल्याचे यावेळी समितीच्या वतीने सांगण्यात आले.

अण्णाभाऊ साठे जयंतीचा निधी पूरग्रस्तांना, जयंती उत्सव समितीचा निर्णय

राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. सातारा, कोल्हापूर आणि सांगली या पश्चिम महाराष्ट्रात पुरामुळे अनेक नागरिकांच्या घरात नुकसान झाले आहे. दरम्यान त्यांचा संसार पुन्हा सुरळीत करण्याच्या उद्देशाने अनेकांनी मदत देण्याचे ठरवले आहे. या पूरग्रस्तांसाठी राज्यातून मदतीचा पूर सुरू आहे. ठाण्यातील अण्णाभाऊ साठे सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीनेही जयंती महोत्सवाला लागणार 5 लाख रुपयांचा निधी पूरग्रस्तांना देण्यात येणार आहे. यात पुरग्रस्तांना लागणाऱ्या गृहोपयोगी वस्तू असणार आहेत.

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 99 वी सुवर्ण महोत्सवी जयंती सोहळा साजरा करण्यात येणार होता. परंतु महाराष्ट्रावर महापुराचे संकट आले असताना माणुसकीच्या दृष्टीकोनातून समितीने हा निर्णय घेतला आहे. जयंती महोत्सवाचा निधी वस्तुस्वरूपात पूरग्रस्तांना वाटप करण्यात यावा, असे निवेदन ठाणे पालिकेच्या महापौर मिनाक्षी शिंदे आणि पालिका उपायुक्त संदीप माळवी यांना देण्यात आले. यावेळी अण्णाभाऊ साठे उत्सव समितीचे अध्यक्ष दीपक आवारे, कार्याध्यक्ष मंगेश सुर्यवंशी, सचिव राजभाई सुर्यवंशी,समीर नेटके आदी उपस्थित होते.

Intro:पूरग्रस्तांना अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा निधी वस्तूस्वरूपात जयंती उत्सव समितीचा एकमताने निर्णयBody:

महापुराचे संकट ओढवलेल्या कोल्हापूर-सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदतीसाठी अनेक सामाजिक संघटना पुढे येऊ लागल्या आहेत. अशाचप्रकारे साहीत्यरत्न अण्णाभाऊ साठे सार्वजनिक उत्सव समितीने देखील कोल्हापूर- सांगली या पूरग्रस्तांना मदतीचा हात पुढे केला आहे. अण्णाभाऊ साठे यांची यंदाची जयंती रद्द करण्यात आली असून महोत्सवाला लागणारा संपूर्ण खर्च पूरग्रस्तांना गृहपयोगी वस्तूच्या स्वरूपात देण्यात येणार असल्याचे यावेळी समितीच्या वतीने सांगण्यात आले.

राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. सातारा,कोल्हापूर,सांगली या पश्चिम महाराष्ट्रात पुरामुळे अनेक नागरिकांच्या घरात नुकसान झाले आहे. दरम्यान त्याचा संसार पुन्हा सुरळीत करण्याच्या उद्देशाने अनेकांनी मदत देण्याचे ठरवले असताना राज्यातून अनेक मदतीचा पूर सुरू झाला आहे. दरम्यान ठाण्यातील अण्णाभाऊ साठे सार्वजनिक उत्सव समितीने जयंती महोत्सवाला लागणार 5 लाख रुपयांचा निधी पूरग्रस्तांना देण्यात येणार आहे, यामध्ये नागरिकांना लागणाऱ्या गृहपयोगी वस्तू स्वरूपात कोल्हापूर-सांगली जिल्ह्यात वाटप करण्यात येणार आहे.

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 99 वा सुवर्ण महोत्सवी जयंती सोहळा साजरा करण्यात येणार होता. परंतु महाराष्ट्रावर पावसाळी महापुराचे संकट आले असताना माणुसकीच्या दृष्टीकोनातून समितीने एकमताने निर्णय घेण्याचे ठरवले. दरम्यान जयंती महोत्सवाचा निधी वस्तुस्वरूपात पूरग्रस्तांना वाटप करण्यात यावा असे निवेदन ठाणे पालिकेच्या महापौर मिनाक्षी शिंदे आणि पालिका उपायुक्त संदीप माळवी यांना देण्यात आले. यावेळी अण्णाभाऊ साठे उत्सव समितीचे अध्यक्ष दीपक आवारे,कार्याध्यक्ष मंगेश सुर्यवंशी, सचिव राजभाई सुर्यवंशी,समीर नेटके आदी जण उपस्थित होते.
Byte दीपक आवारे मातंग समाज नेतेConclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.