ETV Bharat / state

प्राणीप्रेमी अनिता-सपना रोज 70 मांजरांना देतात अन्न - अनिता-सपना मांजरींना जेवण देतात

कोरोनाकाळात मुक्या प्राण्यांच्याही पोटाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ठाण्यातील दोन तरुणी 70 माजरांना रोज अन्न देतात. अनिता शेट्टी अणि सपना पांडे असं त्या तरुणींचं नाव आहे. यासाठी त्यांना दर महिना जवळपास 50 हजार रूपयांपर्यंत खर्च येत आहे.

anita-sapna
अनिता-सपना
author img

By

Published : May 8, 2021, 8:43 PM IST

Updated : May 8, 2021, 8:58 PM IST

ठाणे - कोरोना महामारीचा फटका अख्या जगाला बसला आहे. एकीकडे रस्त्यावर राहणाऱ्या माणसांना अन्न मिळत नाही. मग मुक्या प्राण्यांचा प्रश्न तर दुरच. अशातच ठाण्यातील कचाराळी तलावाच्या परिसरात मांजरे मोठ्या प्रमाणात आहेत. लॉकडाऊनच्या अगोदर या बागेत लोक येत असल्याने त्यांना अन्न मिळत होते. मात्र, लॉकडाऊननंतर त्या मांजरांवर उपासमारीची वेळ आली आहे. ही बाब लक्षात घेत ठाण्यातील अनिता शेट्टी अणि सपना पांडे या दोन तरुणी त्या मांजरांच्या मदतीसाठी पुढे आल्या आहेत.

प्राणीप्रेमी अनिता-सपना रोज 70 मांजरांना देतात अन्न

जवळपास 70 मांजरांना देतात अन्न

या तरुणी स्वः खर्चातून लॉकडाऊन झाल्यापासून कचराळी तलावाच्या परिसरातील मांजरांसाठी अन्न पुरवत आहेत. या ठिकाणी जवळपास 70 मांजरी आहेत. दिवसातून किमान एक वेळ तरी या मांजरांना या तरुणी पुरेसे अन्न देतात. यामध्ये त्यांना मांसाहारही दिला जातो.

दर महिना येतो सुमारे 50 हजार खर्च

मांजराना जेवण देताना अनिता शेट्टी
मांजराना जेवण देताना अनिता शेट्टी

अनिता आणि सपनाला 70 मांजरांना रोज अन्न देतात. यासाठी त्यांना महिन्याला 50 ते 70 हजार रूपयांपर्यंत खर्च येतो. 'जेवढे तुम्ही मुक्या प्राण्यांना मदत कराल तेवढे देव तुम्हाला देत राहील', अशा शब्दात या तरुणींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

सामाजिक भान ठेवण्याचे आवाहन

'सोसायटीमधील एका माणसाने एका मांजराला खाऊ दिलं तर त्याचं भलं होईल. प्रत्येकाने आपल्या परिसरातील मुक्या प्राण्यांना अन्न खाऊ घातलं तर त्याची आम्हाला मदत होईल. आम्ही 70 मांजरांना अन्न देतो. तर तुम्ही किमान एका मांजराला अन्न द्यावे', असे आवाहन अनिता शेट्टीने केले आहे.

हेही वाचा - देशातील ऑक्सिजनच्या वितरणाकरिता नॅशनल टास्क फोर्स नेमा- केंद्राला 'सर्वोच्च' आदेश

हेही वाचा - प्रेमासाठी शाहरुख खान सायकलवरुन दिल्लीहून निघाला स्वीडनला?

Last Updated : May 8, 2021, 8:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.