ETV Bharat / state

Thane Crime : १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिचे अपहरण करणाऱ्या ‘अंडपाव’ला गुजरातमधून अटक - अंडपावला गुजरातमधून अटक

दंगली, खुनाचा प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराने एका १७ अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या ( Minor Girl Kidnap By Andapav ) जाळ्यात ओढून तिचे अपहरण करून पळवून नेल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ( Ullhasnagar Police Arrest Andapav ) अंडपाव नावाच्या गुंडाला गुजरातमधून अटक केली आहे.

Andapav arrested for kidnapping Minor Girl

author img

By

Published : Jan 14, 2022, 8:51 PM IST

ठाणे - दंगली, खुनाचा प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराने एका १७ अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या ( Minor Girl Kidnap By Andapav ) जाळ्यात ओढून तिचे अपहरण करून पळवून नेल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात ( Ullhasnagar Police Arrest Andapav ) अपहरण केल्याचा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास करून उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकाने गुजरातमधील बडोदा शहरातून गुन्हेगाराला अटक केली आहे. संतोष बाबू सायअण्णा उर्फ अंडपाव असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.

प्रतिक्रिया
गंभीर गुन्हा करून केले पीडितेचे अपहरण -

पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार संतोष बाबू सायअण्णा उर्फ अंडपाव याने गेल्या महिन्यात कल्याण ग्रामीण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलावर प्राणघातक हल्ला करून फरार झाला होता. हा गुन्हेगार फरार असतानाच त्यानतर काही दिवसातच त्याने एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे अपहरण केले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून उल्हासनगर व गुन्हे शाखेच्या पथकाने समांतर तपास सुरु केला. पीडितेचे अपहरण करतेवेळी पोलीस आपला माग काढतील यासाठी त्याने मोबाईल बंद केला होता. तर त्याचा मोबाईल त्याचा नंबर कोणाकडे नसल्याने त्याचा तपास लागणे शक्य नव्हते. त्यासाठी पोलिसांनी सुरूवातीला मिळालेल्या माहितीवरून उत्तरप्रदेशमध्ये जाऊन शोध घेतला. मात्र, पोलिसांना गुंगारा देत तो पीडितेला घेऊन पसार झाला होता.

मोबाईल लोकेशनच्या आधारे गुजरातमधून अटक -

उल्हासनगर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांना खबऱ्या मार्फत माहिती मिळाली होती की फरार आरोपी हा उल्हासनगरमधील त्याच्या नजीकच्या सहकाऱ्यांच्या मोबाईलवर संपर्क आहे. त्यांनतर गुप्त बातमीच्या आधारे त्याचा मोबाईल नंबर काढून सीडीआरचे तांत्रिक विश्लेषण केले. असता मोबाईल लोकेशन गुजरात राज्यातील बडोदा याठिकाणी असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने गुजरामध्ये सापळा रचून त्याला अटक केली. तर त्याच्या तावडीतून पीडित मुलीची सुटका केली.

दोन गुन्ह्या प्रकरणातही अटक होणार -

सराईत गुन्हेगारावर आतापर्यंत दरोडा, खुनाचा प्रयत्न आणि दंगल सारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. एका गुन्ह्यात शिक्षा भोगून जामिनावर सुटला होता. आता त्याला कल्याण ग्रामीण आणि उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या गुन्ह्या बाबत अटक होणे बाकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर गुन्हे शाखेच्या पथकाने आज या गुन्हेगाराला अपहरण प्रकरणी उल्हासनगर पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.

हेही वाचा - Wardha Minor Abortion Case : कदम रुग्णालयाच्या परिसरात पुन्हा खोदकाम सुरू; नवीन खुलासे होण्याची शक्यता

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.