ETV Bharat / state

विधानसभा धुमशान: भिवंडीत 'राष्ट्रवादी साफ, काँग्रेस हाप'मुळे शिवसेना जोमात

विधानसभा निवडणुकीचा बिगुल येत्या दोन तीन दिवसांत वाजण्याची शक्यता असल्याने त्या पार्श्वभुमीवर भिवंडीमधील भिवंडी ग्रामीण, भिवंडी पश्चिम, भिवंडी पूर्व या तीनही मतदारसंघांचा घेतलेला आढावा...

author img

By

Published : Sep 21, 2019, 9:59 AM IST

Bhiwandi

ठाणे- भिवंडी लोकसभेचे खासदार कपिल पाटील हे २०१४ साली राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये दाखल झाले. तेव्हापासून राष्ट्रवादीतील शेकडो पदाधिकारी आणि विविध लोकप्रतिनिधी भाजपच्या कळपात सामील झाले. त्यामुळे आताची भाजप हे पूर्णतः राष्ट्रवादी सोडून भाजपात दाखल झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या हातात आहे. मात्र काँग्रेस व राष्ट्रवादीच्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी खासदार कपिल पाटलांची संगत नको म्हणून शिवसेनेत प्रवेश करून त्यांना शह देण्याचा प्रयत्न केला. यामुळे भिवंडीतुन 'राष्ट्रवादी साफ, तर काँग्रेस हाप' मुळे शिवसेना जोमात आली आहे.
भिवंडी तालुक्यात ३ विधानसभा मतदारसंघ असून त्यामध्ये भिवंडी ग्रामीण व भिवंडी पूर्व मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात आहे. तसेच भिवंडी महापालिकेतही शिवसेनेचा उपमहापौर आहे. तर भाजपकडे भिवंडी पश्चिम मतदारसंघ व भिवंडी पंचायत समिती आहे. मात्र, पंचायत समितीमध्ये भाजप-सेना समान सदस्य असून शिवसेनेने काँग्रेसशी हातमिळवणी करत पालिकेत सत्ता काबीज केली. यामुळे भाजपनेही इतर पक्षाच्या सदस्यांना घेऊन पंचायत समिती ताब्यात ठेवली.

भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदार संघात शिवसेना प्रबळ दावेदार; मात्र, युतीवर गणितं अवलंबून-

2014च्या लोकसभा निवडणुकीत असलेली युती आणि विधानसभा निवडणुकांमध्ये युतीचं बिनसलेलं गणित यामुळे शिवसैनिकांनी 'करो या मरो'ची लढत देत या मतदार संघावर आपले अस्तित्व सिद्ध केले. शिवसेनेचे शांताराम मोरे हे 2014च्या निवडणुकीत 57 हजार 082 मते मिळवून 9 हजार 160 च्या मताधिक्याने या निवडणुकीत निवडून येऊन आमदार झाले. त्यावेळी भाजपचे शांताराम पाटील यांनी देखील सेनेला कडवी टक्कर दिली होती. मात्र, त्यांना 47 हजार 922 मतांवर समाधान मानावे लागले. तब्बल 25 वर्ष भाजपचे अधिराज्य व वर्चस्व असलेला हा मतदार संघ शिवसैनिकांनी जिकरीची लढाई देत आपल्याकडे खेचून घेतला.
भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव असल्याने 2014च्या निवडणुकीत शिवसेनेच्या वतीने शांताराम मोरे यांना पहिल्यांदाच उमेदवारी मिळाली होती. शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांच्यासह सेना कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत विशेष लक्ष दिल्याने भाजपच्या वर्चस्वाखाली असलेला हा मतदार संघ शिवसेनेने आपल्याकडे खेचून घेतला. 2014च्या निवडणुकीनंतर बिनसलेल्या युतीमुळे शिवसेनेने या ग्रामीण मतदार संघात आपली पकड मजबूत करत पुढे ग्रामपंचायत निवडणुकांसह कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा परिषद, व पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिवसेनेने वेळोवेळी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. यावेळी मात्र या विधानसभा मतदार संघाची गणिते बदलली आहेत . सेना-भाजपच्या युतीची शक्यता वाढल्याने सेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. कारण युती झाली तर हा मतदार संघ पुन्हा सेनेच्या वाट्याला असणार आहे. आणि मागील पाच वर्षांत सेनेने या मतदार संघात केलेली कामे व पक्षाची वाढलेली ताकद याचा निश्चितच फायदा या निवडणुकीत होणार आहे. तर दुसरीकडे भाजपनेही आपली रणनीती आखायला सुरुवात केली असून या मतदार संघासाठी उमेदवारांच्या चाचपणीसाठी पक्षश्रेष्ठींनी घेतलेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींमध्ये भाजपचे महादेव घाटाळ, दशरथ पाटील, शांताराम पाटील, संतोष जाधव, वाड्याचे भाजप कार्यकर्ते डॉ. हिरवे, गौंड अशा कार्यकर्त्यांनी मुलाखती दिल्या आहेत.

भिवंडी पश्चिम मतदार संघात भाजपला काँग्रेसचे आव्हान, तर काँग्रेससमोर उमेदवार निवडीचा पेच-

भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघ सध्या भाजपच्या ताब्यात असून भाजपचे आमदार महेश चौघुले हे या मतदार संघाचे आमदार आहेत. 2014च्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेचा फायदा घेत काँग्रेस आणि समाजवादीच्या हातातून हा मतदार संघ भाजपने खेचून घेतला आहे . यापूर्वी या मतदार संघावर समाजवादी आणि काँग्रेसचेच वर्चस्व राहिले आहे. सध्या विधानसभा निवडणूक तोंडावर आली असल्याने प्रत्येक पक्षाने आपापल्या उमेदवारांची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. सध्याच्या परिस्थितीत तरी सेना-भाजपची युती असली तरी युती तुटण्याचा संभाव्य धोका लक्षात घेत ऐन वेळेवर उमेदवारांची शोधाशोध नको म्हणून भाजपने नुकताच या मतदारसंघासह भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येणाऱ्या सहाही जागांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या होत्या. या मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व तसेच विद्यमान आमदार स्वतः भाजपचे असूनही या मतदार संघासाठी देखील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. त्यातच भाजपतर्फे आपण विद्यमान आमदार असूनही पश्चिम मतदार संघासाठी देखील पक्षश्रेष्ठींनी मुलाखती घेतल्याने विद्यमान आमदार महेश चौघुले यांना झालेला संताप व त्यांचा चढलेला पारा यावेळी सर्वांनी पहिला आहे. मुलाखतीच्या ठिकाणी 2009च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष निवडणूक लढलेले भिवंडीतील साईनाथ पवार हजर झाल्याने आमदार महेश चौघुले यांनी थेट पवार यांच्या उपस्थितीवर आक्षेप घेत त्याच्याशी वाद घातला. त्यामुळे साईनाथ पवार हे विद्यमान आमदार महेश चौघुले यांना उमेदवारीसाठी डोकेदुखी ठरणार असल्याचे बोलले जात आहे. भिवंडी पश्चिम मतदारसंघ भाजपकडे व महापालिकेची सत्ता काँग्रेसकडे असूनही या भागाचा हवा तितका विकास आजही झालेला नाही. मात्र विकासाचा अजेंडा बाजूला ठेऊन आजवर या निवडणुकांमध्ये जाती धर्माचे राजकारणच चालत आले आहे. भिवंडी पश्चिम मतदार संघात शहरात मुस्लिम मतदार बहुसंख्य आहेत. तर या मतदारसंघात खोणी, शेलार, काटई, कारीवली या ग्रामीण भागात मोडणाऱ्या गावांचाही समावेश असल्याने या मतदारांची भूमिका देखील महत्वाची ठरणार आहे. या मतदारसंघात सुमारे 40 टक्के मतदार हा मुस्लिम समाजाचा असून उर्वरित मतदार हा आगरी, गुजराती, राजस्थानी, जैन, बौद्ध , तेलुगू आणि उत्तर भारतीय असा विभागला गेला आहे. त्यामुळे या ठिकाणचा इतिहास पाहता आजपर्यंत या निवडणुका या थेट हिंदू-मुस्लिम अशाच झालेल्या आहेत. त्यातच सध्या महापालिकेवर काँग्रेसची एक हाती सत्ता असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये या निवडणुकीसाठी उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, हा मतदारसंघ मुस्लिम बहुल असल्याने जाती धर्माच्या समीकरणांवर निवडणूक झाल्यास समाजवादी, राष्ट्रवादी, एमआयएम व काँग्रेस पक्षांचे उमेदवार जवळपास मुस्लिम असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे काँग्रेसच्या हक्कांच्या मतांची विभागणी होण्याची शक्यता देखील नाकारता येणार नाही. ज्याचा निश्चितच फायदा भाजपला होऊ शकतो. एकीकडे मुस्लिम उमेदवारांची वाढती संख्या आणि त्यामुळे होणारी मतांची विभागणी तर दुसरीकडे भाजपचे तगडे आव्हान. असा दुहेरी पेच काँग्रेस समोर निर्माण होऊ शकतो. भाजपचे तगडे आव्हान स्वीकारण्यासाठी या मतदार संघात काँग्रेसने हिंदू अजेंडा अवलंबविला तर त्याचा फायदा काँग्रेसला निश्चितच होऊ शकतो. कारण काँग्रेसकडे पारंपरिक व हक्काचा मुस्लिम मतदार आहेच मात्र, शहराबरोबरच ग्रामीण भागातील हिंदू मतदारांची मते आपल्या बाजूला खेचून आणायची असतील तर काँग्रेसने एखाद्या हिंदू उमेदवाराला संधी दिल्यास काँग्रेसचे वर्चस्व असलेला हा मतदारसंघ या निवडणुकीत काँग्रेस भाजपकडून खेचून घेऊ शकतो. मात्र, त्यासाठी उमेदवार निवडीचा सगळ्यात मोठा पेच काँग्रेस पक्षश्रेष्ठींसमोर निर्माण होणार आहे. तर दुसरीकडे हातात आलेला मतदार संघ काँग्रेसच्या ताब्यात जाऊ नये म्हणून भाजपने देखील या मतदार संघात जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

भिवंडी पूर्व विधानसभा मतदार संघात सेनेला भाजपचेच आव्हान-

एकीकडे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांना भाजपने गळाला गुंतविला नंतर सेनेनेही आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या ग्रामीण कार्यकर्त्यांना आपल्या गोटात खेचून घेतले. नुकताच राष्ट्रवादीच्या ठाणे जिल्ह्यातील जि.प. सदस्यांना शिवसेनेने शिवबंधनात अडकविले आहे. तर दुसरीकडे भाजपच्या नेत्यांनी विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचा निर्णय घेतला असल्याने सेना कार्यकर्त्यांच्या पोटात गोळा आला आहे. या फोडाफोडीच्या राजकारणाचा परिणाम लागावी विधानसभा निवडणुकीत निश्चितच होणार असून युती न झाल्यास सेनेच्या उमेदवारांसमोर भाजपच्या उमेदवारांचे तगडे आव्हान असणार आहे.
सेना-भाजपची युती असली तरी आमदार रुपेश म्हात्रे यांच्या विरोधात अपक्ष अथवा इतर पक्षातून निवडणूक लढविण्याची तयारी भाजपचे संतोष शेट्टी यांनी केली आहे. त्यामुळे सेनेचे आमदार रुपेश म्हात्रे यांच्यासमोर संतोष शेट्टी यांचे मोठे आव्हान असणार आहे. भाजपाचे संतोष शेट्टी मागील 25 वर्षांपासून नगरसेवक आहेत. त्यांनी 2014मध्ये राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर या विधानसभा निवडणूक काळात वंचित बहुजन आघाडीत एमआयएमचा बोलबाला चांगला असल्याने या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीही काट्याची टक्कर देणार आहे. विशेषतः भिवंडी पूर्व विधानसभा मतदार संघात मुस्लिम व बहुजन मते असल्याने यावेळी वंचितच्या उमेदवाराचे आव्हानही युती अथवा सेना भाजपच्या उमेदवारांसमोर असणार आहे. एमआयएम मधून शहराध्यक्ष शादाब उस्मानी यांनी विधानसभा निवडणुकीची तय्यारी केली आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीमुळे या मतदार संघातून काँग्रेस आपल्या पदरात ही उमेदवारी पाडून घेण्यासाठी तयार आहे. आघाडीतून भिवंडी पूर्वमधून काँग्रेसला उमेदवारी मिळणार असल्याची आशा निर्माण झाली असल्याने काँग्रेसमधून अनेक कार्यकर्त्यांनी उमेदवारीसाठी आपली इच्छा पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केली आहे. काँग्रेसतर्फे निवडणूक लढविण्यास माजी आमदार योगेश पाटील यांच्यासह काँग्रेसचे अरुण राऊत, तारिक फारुकी, प्रशांत लाड यांच्यासह इतरही उमेदवार इच्छुक आहेत. तर समाजवादी पक्षाचे रिजवान मिस्टर हे देखील समाजवादीतुन पूर्वची निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे समजते. रिझवान मिस्टर हे समाजवादीचे महाराष्ट्र राज्याचे जनरल सेक्रेटरी असल्याने समाजवादीची उमेदवारी आपल्या पदरात पडून घेण्यासाठी ते पक्षश्रेष्ठींकडे निश्चितच प्रयत्न करतील. मात्र, खरी लढत हि सेना-भाजप, काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीत होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यातही आमदार रुपेश म्हात्रे व संतोष शेट्टी यांच्यात खरी लढत होणार असल्याचा बोलबाला सध्या या विधानसभा मतदार संघात सुरु आहे. तर आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी व आमदारकीची हॅट्रिक मारून सेनेच्या मंत्रिमंडळात स्थान मिळविण्यासाठी आमदार रुपेश म्हात्रे यांच्यासाठी ही निवडणूक महत्वाची मानली जात आहे.

Intro:kit 319Body:विधानसभेचे धुमशान : भिवंडीत 'राष्ट्रवादी साफ, काँग्रेस हाप ' मुळे शिवसेना जोमात

ठाणे :- भिवंडी लोकसभेचे खासदार कपिल पाटील हे २०१४ साली राष्ट्रवादी सोडून भाजपात दाखल झाले. तेव्हापासून राष्ट्रवादीतील शेकडो पदाधिकारी आणि विविध लोकप्रतिनिधी भाजपच्या कळपात सामील झाले. त्यामुळे आताची भाजप हे पूर्णतः राष्ट्रवादी सोडून भाजपात दाखल झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या हातात आहे. मात्र काही कॉग्रेस व राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी खासदार कपिल पाटीलाची संगत नको म्हणून शिवसेनेत प्रवेश करून त्यांना शह देण्याचा प्रयत्न केला. यामुळे भिवंडीतुन 'राष्ट्रवादी साफ, तर काँग्रेस हाप ' मुळे शिवसेना जोमात आली आहे.
भिवंडी तालुक्यात ३ विधानसभा मतदारसंघ असून त्यामध्ये भिवंडी ग्रामीण व भिवंडी पूर्व मतदारसंघ शिवसेनेच्या कबज्यात आहे. तसेच भिवंडी महापालिकेतही शिवसेनेचा उपमहापौर आहे. तर भाजपकडे भिवंडी पश्चिम मतदारसंघ व भिवंडी पंचायत समिती आहे. मात्र पंचायत समिती मध्ये भाजप - सेना समान सदस्य असून शिवसेनेने कॉग्रेसशी हातमिळवणी करून पालिकेत सत्ता काबीज केली. यामुळे भाजपनेही इतर पक्षाच्या सदस्यांना घेऊन पंचयात समिती ताब्यात ठेवली.

भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदार संघात शिवसेना प्रबळ दावेदार ; मात्र युतीवर गणितं अवलंबून

2014 च्या लोकसभा निवडणुकीत असलेली युती आणि विधानसभा निवडणुकांमध्ये युतीचं बिनसलेलं गणित यांमुळे शिवसैनिकांनी करो या मरो ची लढत देत या मतदार संघावर आपले अस्तित्व सिद्ध केले . शिवसेनेचे शांताराम मोरे हे 2014 च्या निवडणुकीत 57 हजार 082 मते मिळवून 9 हजार 160 च्या मताधिक्याने या निवडणुकीत निवडून आमदार झाले. त्यावेळी भाजपचे शांताराम पाटील यांनी देखील सेनेला कडवी टक्कर दिली होती मात्र त्यांना 47 हजार 922 मतांवर समाधान मानावे लागले. तब्बल 25 वर्ष भाजपचे अधिराज्य व वर्चस्व असलेला हा मतदार संघ शिवसैनिकांनी जिकरीचे लढाई देत आपल्याकडे खेचून घेतला.
भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदार संघ अनुसूचित जमातीसाठी राखीव असल्याने 2014 च्या निवडणुकीत शिवसेनेच्या वतीने शांताराम मोरे यांना पहिल्यांदाच उमेदवारी मिळाली होती. शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांच्यासह सेना कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत विशेष लक्ष दिल्याने भाजपच्या वर्चस्वाखाली असलेला हा मतदार संघ शिवसेनेने आपल्या कडे खेचून घेतला. 2014 च्या निवडणुकीनंतर बिनसलेल्या युतीमुळे शिवसेनेने या ग्रामीण मतदार संघात आपली पकड मजबूत करत पुढे ग्राम पंचायत निवडणुकांसह कृषी उत्पन्न बाजार समिती , जिल्हा परिषद, व पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिवसेनेने वेळोवेळी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. यावेळी मात्र या विधानसभा मतदार संघाची गणित बदलली आहेत . सेना भाजपच्या युतीची शक्यता वाढल्याने सेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. कारण युती झाली तर हा मतदार संघ पुन्हा सेनेच्या वाट्याला असणार आहे. आणि मागील पाच वर्षात सेनेने या मतदार संघात केलेली कामे व पक्षाची वाढलेली ताकद याचा निश्चितच फायदा या निवडणुकीत होणार आहे. तर दुसरीकडे भाजपनेही आपली रणनीती आखायला सुरुवात केली असून या मतदार संघासाठी उमेदवारांच्या चाचपणी साठी पक्षश्रेष्ठींनी घेतलेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींमध्ये भाजपचे महादेव घाटाळ , दशरथ पाटील , शांताराम पाटील, संतोष जाधव , वाड्याचे भाजप कार्यकर्ते डॉ हिरवे , भाजप कार्यकर्ते गौंड अशा भाजप कार्यकर्त्यांनी मुलाखती दिल्या आहेत.

भिवंडी पश्चिम मतदार संघात भाजपला काँग्रेसचे आव्हान, तर काँग्रेससमोर उमेदवार निवडीचा पेच

भिवंडी पश्चिम विधानसभा मतदार संघ सध्या भाजपच्या ताब्यात असून भाजपचे आमदार महेश चौघुले हे या मतदार संघाचे आमदार आहेत . 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेचा फायदा घेत काँग्रेस आणि समाजवादिच्या हातातून हा मतदार संघ भाजपने खेचून घेतला आहे . यापूर्वी या मतदार संघावर समाजवादी आणि काँग्रेसचेच वर्चस्व राहिलेले आहे. सध्या विधानसभा निवडणूक तोंडावर आली असल्याने प्रत्येक पक्षाने आपापल्या उमेदवारांची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे . सध्याच्या परिस्थितीत तरी सेना भाजपची युती असली तरी युती तुटण्याचा संभाव्य धोका लक्षात घेत ऐन वेळेवर उमेदवारांची शोधाशोध नको म्हणून भाजपने नुकताच या मतदार संघासह भिवंडी लोकसभा मतदार संघाच्या अंतर्गत येणाऱ्या सहाही जागांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या होत्या. या मतदार संघावर भाजपचे वर्चस्व तसेच विद्यमान आमदार स्वतः भाजपचे असूनही या मतदार संघासाठी देखील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. त्यातच भाजपतर्फे आपण विद्यमान आमदार असूनही पश्चिम मतदार संघासाठी देखील पक्षश्रेष्ठींनी मुलाखती घेतल्याने विद्यमान आमदार महेश चौघुले यांना झालेला संताप व त्यांचा चढलेला पारा यावेळी सर्वांनी पहिला आहे. मुलाखतीच्या ठिकाणी 2009 च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष निवडणूक लढलेले भिवंडीतील साईनाथ पवार हजर झाल्याने आमदार महेश चौघुले यांनी थेट पवार यांच्या उपस्थितीवर आक्षेप घेत त्याच्याशी वाद घातला. त्यामुळे साईनाथ पवार हे विद्यमान आमदारांना महेश चौघुले यांना उमेदवारीसाठी डोकेदुखी ठरणार असल्याचे बोलले जात आहे. भिवंडी पश्चिम मतदार संघ भाजपकडे व महापालिकेची सत्ता काँग्रेसकडे असूनही या भागाचा हवा तितका विकास आजही झालेला नाही. मात्र विकासाचा अजेंडा बाजूला ठेऊन आजवर या निवडणुकांमध्ये जाती धर्माचे राजकारणच चालत आले आहे. भिवंडी पश्चिम मतदार संघात शहरात मुस्लिम मतदार बहुसंखे आहेत. तर या मतदार संघात खोणी, शेलार, काटई, कारीवली या ग्रामीण भागात मोडणाऱ्या गावांचाही समावेश असल्याने या मतदारांची भूमिका देखील महत्वाची ठरणार आहे. या मतदार संघात सुमारे 40 टक्के मतदार हा मुस्लिम समाजाचा असून उर्वरित मतदार हा आगरी, गुजराती, राजस्थानी, जैन, बौद्ध , तेलुगू आणि उत्तर भारतीय असा विभागला गेला आहे. त्यामुळे या ठिकाणचा इतिहास पाहता आजपर्यंत या निवडणुका या थेट हिंदू-मुस्लिम अशाच झालेल्या आहेत. त्यातच सध्या महापालिकेवर काँग्रेसची एक हाती सत्ता असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये या निवडणुकीसाठी उत्साहाचे वातावरण आहे. मात्र हा मतदार संघ मुस्लिम बहुल असल्याने जाती धर्माच्या समीकरणांवर निवडणूक झाल्यास समाजवादी , राष्ट्रवादी , एमआयएम व काँग्रेस पक्षांचे उमेदवार जवळपास मुस्लिम असन्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे काँग्रेसच्या हक्कांच्या मतांची विभागणी होण्याची शक्यता देखील नाकारता येणार नाही. ज्याचा निश्चितच फायदा भाजपला होऊ शकतो. एकीकडे मुस्लिम उमेदवारांची वाढती संख्या आणि त्यामुळे होणारी मतांची विभागणी तर दुसरीकडे भाजपचे तगडे आव्हान. असा दुहेरी पेच काँग्रेस समोर निर्माण होऊ शकतो. भाजपचे तगडे आव्हान स्वीकारण्यासाठी या मतदार संघात काँग्रेसने हिंदू अजेंडा अवलंबविला तर त्याचा फायदा काँग्रेसला निश्चितच होऊ शकतो. कारण काँग्रेसकडे पारंपरिक व हक्काचा मुस्लिम मतदार आहेच मात्र शहराबरोबरच ग्रामीण भागातील हिंदू मतदारांची मते आपल्या बाजूला खेचून आणायची असतील तर काँग्रेसने एखाद्या हिंदू उमेदवाराला संधी दिल्यास काँग्रेसचे वर्चस्व असलेला हा मतदार संघ या निवडणुकीत काँग्रेस भाजपकडून खेचून घेऊ शकतो. मात्र त्यासाठी उमेदवार निवडीचा सगळ्यात मोठा पेच काँग्रेस पक्षश्रेष्ठींसमोर निर्माण होणार आहे. तर दुसरीकडे हातात आलेला मतदार संघ काँग्रेसच्या ताब्यात जाऊ नये म्हणून भाजपने देखील या मतदार संघात जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

भिवंडी पूर्व विधानसभा मतदार संघात सेनेला भाजपचेच आव्हान...

एकीकडे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांना भाजपने गळाला गुंतविला नंतर सेनेनेही आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या ग्रामीण कार्यकर्त्यांना आपल्या गोटात खेचून घेतले. नुकताच राष्ट्रवादीच्या ठाणे जिल्ह्यातील जिप सदस्यांना शिवसेनेने शिवबंधनात अडकविले आहे तर दुसरीकडे भाजपच्या नेत्यांनी विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचा निर्णय घेतला असल्याने सेना कार्यकर्त्यांच्या पोटात गोळा आला आहे. या फोडाफोडीच्या राजकारणाचा परिणाम लागावी विधानसभा निवडणुकीत निश्चितच होणार असून युती बिस्कटल्यास सेनेच्या उमेदवारांसमोर भाजपच्या उमेदवारांचे तागडे आव्हान असणार आहे.
सेने भाजपची युती असली तरी आमदार रुपेश म्हात्रे यांच्या विरोधात अपक्ष अथवा इतर पक्षातून निवडणूक लढविण्याची तय्यारी भाजपचे संतोष शेट्टी यांनी केली आहे. त्यामुळे सेनेचे आमदार रुपेश म्हात्रे यांच्यासमोर संतोष शेट्टी यांचे मोठे आव्हान असणार आहे. भाजपाचे संतोष शेट्टी मागील 25 वर्षांपासून नगरसेवक आहेत. त्यांनी 2014 मध्ये राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर या विधानसभा निवडणूक काळात वंचित बहुजन आघाडीत एमआयएमचा बोलबाला चांगला असल्याने या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीही काटे कि टक्कर देणार आहे. विशेषतः भिवंडी पूर्व विधानसभा मतदार संघात मुस्लिम व बहुजन मते असल्याने यावेळी वंचितच्या उमेदवाराचे आव्हान देखील युती अथवा सेना भाजपच्या उमेदवारांसमोर असणार आहे. एमआयएम मधून शहर अध्यक्ष शादाब उस्मानी यांनी विधानसभा निवडणुकीची तय्यारी केली आहे. तर काँग्रेस - राष्ट्रवादीची युती झाल्यास या मतदार संघातून काँग्रेस आपल्या पदरात हि उमेदवारी पडू घेण्याच्या जोरदार हालचाली सुरु आहेत. आघाडीतून भिवंडी पूर्व मधून काँग्रेसला उमेदवारी मिळणार असल्याची आशा निर्माण झाली असल्याने काँग्रेस मधून अनेक कार्यकर्त्यांनी उमेदवारीसाठी आपली इच्छा पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केली आहे. काँग्रेस तर्फे निवडणूक लढविण्यास माजी आमदार योगेश पाटील यांच्यासह काँग्रेसचे अरुण राऊत, तारिक फारुकी, प्रशांत लाड यांच्यासह इतरही उमेदवार इच्छुक आहेत. तर समाजवादी पक्षाचे रिजवान मिस्टर हे देखील समाजवादीतुन पूर्वची निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे समजते. रिझवान मिस्टर हे समाजवादीचे महाराष्ट्र राज्याचे जनरल सेक्रेटरी असल्याने समाजवादीची उमेदवारी आपल्या पदरात पडून घेण्यासाठी ते पक्षश्रेष्ठींकडे निश्चितच प्रयत्न करतील. मात्र खरी लढत हि सेना - भाजप - काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीत होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यातही आमदार रुपेश म्हात्रे व संतोष शेट्टी यांच्या खरी लढत होणार असल्याचा बोलबाला सध्या या विधानसभा मतदार संघात सुरु आहे. तर आपले राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी व आमदारकीची हॅट्रिक मारून सेनेच्या मंत्रिमंडळात स्थान मिळविण्यासाठी आमदार रुपेश म्हात्रे यांच्यासाठी हि निवडणूक महत्वाची मानली जात आहे.

Conclusion:bhiwnadi vidhansbha
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.