ठाणे - राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्रातील 33 कोटी वृक्ष लागवडीत मोठा भ्रष्टाचार केला असून, त्याच भ्रष्टाचाराच्या पैशातून पाचशे कोटींचा बंगला बांधल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी केला आहे. ते बदलापूर येथील एका कार्यक्रमात बोलत होते.
हेही वाचा - सत्ता गेल्याने भाजप नेते वैफल्यग्रस्त; थोरातांचा मुनगंटीवारांना टोला
बदलापूर नगरपरिषदेचे राष्ट्रवादीचे गटनेते आणि नगरसेवक आशिष दामले यांनी बदलापुरात उभारलेल्या 'दादास' जिमच्या उदघाट्नच्या कार्यक्रमात अमोल मिटकरी बोलत होते. आता या गंभीर आरोपाला माजी वन आणि अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार काय उत्तर देतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
उदयनराजेंना छत्रपतींचे वंशज असल्याचे पुरावे मागणे चुकीचे
उदयनराजे यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असल्याचे पुरावे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मागितले होते. राऊत यांची ती चुक होती. त्याचे समर्थन केले जाऊ शकत नाही, असे मिटकरी यांनी बोलत खासदार संजय राऊत यांच्यावर नाराजी व्यक्त केली. तर तान्हाजी चित्रपटात माध्यमातून चुकीचा इतिहास दाखवला जात असल्याचेही त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले.