नवी मुंबई - तळोजा औद्योगिक वसाहतीत वायू गळती होणे नेहमीचेच झाले आहे. तळोजामधील 'फोरस्टार फ्रोझन फूड्स' कंपनीत अमोनिया वायूची गळती झाल्याची घटना आज (रविवारी) सायंकाळी सात वाजता घडली आहे. येथील स्थानिकांना उलट्याचा त्रास सहन करावा लागला आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही वायू गळती थांबव्याचे काम स्थानिकांनीच केले.
हेही वाचा - चितळांची शिकार करुन मटण विक्री करणाऱ्या नऊ आरोपींना अटक
अमोनिया वायू गळती झाल्याने कंपनी परिसरातील ग्रामस्थांना या वायूचे विपरित परिणाम जाणवू लागले. स्थानिकांना चक्कर येणे, पोटात मळमळणे तसेच उलट्याचा त्रास होऊ लागला होता. त्यामुळे काही तास या परिसरात पळापळीचे वातावरण निर्माण झाले होते. वायू गळती झाल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी कंपनीत धाव घेऊन, ज्या पाईप वॉल मधून वायू गळती होत होती, तो वॉल बंद करुव वायू गळती बंद केल्याचे प्रत्यक्षदर्शिने सांगितले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तळोजा औद्योगिक वसाहत परिसरात वारंवार वायू गळती होणे तसेच रासायनिक वापराचे पाणी सोडणे, यामुळे नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे नागरिकांचा रोष होताच आता ही वायू गळती झाल्याने नागरिक हवालदील झाले आहेत.
हेही वाचा - पुण्यात बंद सदनिकेत नग्नावस्थेत आढळला महिलेचा मृतदेह