ETV Bharat / state

ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी सहा रुग्णवाहिकांचे लोकार्पण - Thane Zilla Parishad news

राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने दिलेल्या रुग्णवाहिका ठाणे जिल्हा परिषदेने ग्रामीण भागातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांना वाटप केल्या आहेत.

ambulance
रुग्णवाहिका वाटप करताना
author img

By

Published : May 27, 2021, 6:24 PM IST

ठाणे - राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने दिलेल्या रुग्णवाहिका जिल्हा परिषदेने ग्रामीण भागातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांना वाटप केल्या आहेत. आज जिल्हा परिषदेच्या आवारात या रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. प्रभारी जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाष पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे यांच्या उपस्थित रुग्णवाहिका रुग्णसेवेसाठी रवाना करण्यात आल्या.

यावेळी आरोग्य व बांधकाम समिती सभापती कुंदन पाटील, कृषी,पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती सभापती संजय निमसे, समाजकल्याण समिती सभापती नंदा उघडा, जिल्हा परिषद सदस्य रेखा कंठे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिष रेंघे आदी उपस्थित होते.

ग्रामिण कार्यक्षेत्रातील रुग्णांना ने-आण करण्यासाठी मदत

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यामधील वज्रेश्वरी प्राथमिक आरोग्य केंद्र,शहापूर तालुक्यातील अघई आणि टेंभा प्राथमिक आरोग्य केंद्र आणि मुरबाड तालुक्यातील किशोर प्राथमिक आरोग्य केंद्र, शिवले आणि शिरोशी आदी आरोग्य केंद्राना या रुग्णवाहिका सुपूर्द करण्यात आल्या आहेत.ठाणे जिल्ह्यातील या ग्रामिण कार्यक्षेत्रातील रुग्णांना ने-आण करण्यासाठी या रुग्णवाहिकांची मोठी मदत होणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्याच्या आणीबाणी प्रसंगी या रुग्णवाहिका महत्वाची भूमिका बजावतील.असा विश्वास प्रशासनाने तसेच लोकप्रतिनिधी यांनी व्यक्त केला.

ग्रामीण उप रुग्णालयांना रुग्णवाहिका सुपूर्त

प्राथमिक आरोग्य केंद्रासह ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण उप रुग्णालयामध्ये देखील रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. यामध्ये ग्रामीण उप रुग्णालय भिवंडी, शहापूर,अंबरनाथ, खर्डी, टोकावडे, गोवेली, आणि मनोरुग्णालय ठाणे आदी ठिकाणी देखील शासनाने रुग्णवाहिका पुरविल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.