ठाणे - राज्याचे नगरविकास मंत्री आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे ( Again Threat to Eknath Shinde ) यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. गृहराज्य मंत्र्यांनी शिंदे यांच्या सुरक्षेत वाढ केली ( Security Increased of Eknath Shinde ) असून यापूर्वी त्यांना देण्यात आलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा वाढवण्याचा आता निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत जिल्हा माहिती कार्यालयाने अधिकृत माहिती दिली आहे.
तपास क्राईम ब्रांचकडे -
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना भामरागढ एरिया कमिटीच्या नावाने शुक्रवारी पत्र आले होते. या पत्रात तुम्ही गडचिरोलीचा खूप विकास करीत आहात. पण आम्हाला मोठी समस्या निर्माण करीत आहात. पोलिसांच्या कारवाईत अनेक नक्षलवादी मारले गेले आहेत. याचा आम्ही नक्कीच बदला घेऊ, अशी धमकी या पत्रातून देण्यात आली होती. या प्रकरणी ठाणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात आला आहे.
ठाणे आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना भामरागढ एरिया कमिटीच्या नावाने ठाण्यातील लुईसवाडीतील नंदनवन या निवासस्थानी हे धमकीचे पत्र आले आहे.आमचे साथीदार एकट्या गडचिरोली जिल्ह्यातच नाही, तर सर्व शहरांमध्ये आहे. तुमच्या आसपास ते फिरत आहेत, याची जाणीव तुम्हाला नाही. नक्षलवाद पूर्णपणे संपवण्याची जी भाषा तुम्ही करता, ते शक्य नाही. कारण देशातील अनेक राज्यांत आम्ही आहोत. तुम्हीच काय कुणीही आम्हाला संपवू शकत नाही, असे पत्रात नमूद करण्यात आले होते.
हेही वाचा - Rahul Bajaj Passes Away : प्रसिद्ध उद्योजक राहुल बजाज यांचे निधन
गडचिरोलीचे पालकमंत्री झाल्यावर दुसऱ्यांदा धमकी -
मंत्री एकनाथ शिंदे हे गडचिरोली जिल्ह्याचे पालक मंत्री आहे. त्यातील बराचसा भाग नक्षलग्रस्तांचा भाग आहे. या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शिंदे यांनी मूलभूत सुविधा वाढवून अनेक विकास कामे केली आहेत. नक्षलवाद्यांनी विरोध दर्शविलेली अनेक विकास कामे देखील सुरू करण्यात आली आहेत. या कारणास्तव मंत्री शिंदे यांच्यावर नक्षलवाद्यांचा राग आहे. त्यामुळे मंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी देण्यात आली. या आधीही एकनाथ शिंदे यांना नक्षली कारवाया सुरू केल्याने धमकी आली होती.