ठाणे - राज्यामध्ये कोरोना विषाणू पसरू नये म्हणून, सरकारने गर्दीचे कार्यक्रम करू नये, असे आवाहन केले होते. मात्र, त्यानंतरही नागरिक वेगवेगळी शक्कल लढवत एकत्र येत आहेत. अशाच प्रकारे भिवंडी येथे डोहाळेच्या कार्यक्रमामध्ये गरोदर महिला आणि त्यांना भेटायला आलेल्या स्त्रियांनी तोंडाला मास्क लावून हा कार्यक्रम पूर्ण केला. यामध्ये गरोदर महिलेने सर्वांन कोरोनापासून बचाव करण्याचा संदेशही दिला.
हेही वाचा - आठवलेंचा नवा नारा... म्हणून जागा झाला देश सारा
कोरोना विषाणूचा प्रसार जगभर पसरला असतानाच, सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून आल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर जनजागृती करून कोरोना विषाणूपासू आपला बचाव कसा करू शकतो याबाबत सरकारसह विविध सामाजिक संघटना मार्गदर्शन करीत आहे. त्यातच भिवंडी शहरातील मीठपाडा येथील पुनम मोनीश गायकवाड या नवविवाहितेने आपल्या पहिल्या गरोदरपणातील सातव्या महिन्यात डोहाळे निमीत्ताने जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता.