ठाणे - दारू पिऊन घरी आल्यावर झालेल्या वादातून पत्नीचा खून करणाऱ्या नराधमाला ठाणे गुन्हे शाखेने तब्बल १३ वर्षांनंतर अटक केली आहे. ही घटना १३ वर्षांपूर्वी माजीवाडा येथे घडली होती. नराधम सुरेश शेट्टी (वय-४२) याने आपल्या पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून पेटून दिले होते. यात पत्नीचा होरपळून मृत्यू झाला. आरोपीला पोलिसांनी बंगळुरू येथून अटक केली व कापूरबावडी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
हेही वाचा - नागपुरात कामठी नगर परिषद सफाई कर्मचाऱ्याची हत्या
आरोपी सुरेश संजीव शेट्टी याला दारू पिण्याचे व्यसन होते. त्याने २० मार्च २००७ रोजी दारू पिऊन घरी आल्यानंतर दारू पिण्याच्या कारणास्तव पती-पत्नीमध्ये भांडण झाले होते. आरोपीने राग येऊन पत्नी मीना शेट्टीच्या (वय-३०) अंगावर घरातील रॉकेलने भरलेला कॅन ओतून तीला पेटून दिले. मीनावर सिव्हिल रुग्णालयात उपचार चालू असतानाच तीचा मृत्यू झाला. यावेळी आरोपी पत्नीच्या उपचारासाठी पैसे घेऊन येण्याच्या बहाण्याने तो पळून गेला होता. स्थानिक पोलीसांनी आरोपीचा वेळोवेळी शोध घेऊन देखील हा आरोपी पोलिसांच्या हाताला लागत नव्हता.
हेही वाचा - साताऱ्यात सिद्धनाथ पतसंस्थेच्या अध्यक्षाने चक्क रिव्हॉल्वरचा धाक दाखवून प्रोसिडींग पळवले
याप्रकरणी ठाणे गुन्हे शाखा क्रमांक १ चे पोलीस हवालदार प्रकाश कदम यांना बातमीदाराकडून मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपीला कर्नाटक राज्यातील जयनगर येथून अटक केली.