ETV Bharat / state

पनवेल महापालिका हद्दीत विना मास्क फिरणाऱ्यांकडून दंड वसुली

खारघर, कळंबोली, कामोठे व पनवेल या चारही प्रभागाचे अधिकारी हे अतिक्रमण विरोधी पथकाच्या माध्यमातून कारवाई करत आहेत. आतापर्यंत विना मास्क फिरणाऱ्या 162 नागरिकांवर दंडात्मक कारवाई करून 16, 200 इतकी दंडाची रक्कम वसूल करण्यात आली आहे.

panvel latest news  panvel municipality news  panvel corona update  पनवेल कोरोना अपडेट  पनवेल महापालिका न्यूज
पनवेल महापालिका हद्दीत विना मास्क फिरणाऱ्यांकडून दंड वसुली
author img

By

Published : Jul 1, 2020, 5:08 PM IST

नवी मुंबई - पनवेल महानगरपालिका हद्दीत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णसंख्या दोन हजारांच्यावर गेलेली आहे. आजपर्यंत कामोठे व खारघर वगळता उर्वरीत भागात कोरोनाचे रुग्ण कमी प्रमाणात आहेत. मात्र, आता दाट लोकवस्तीच्या भागात मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या वाढत आहे. लोक वाटेल तसे विना मास्क फिरत आहेत. अशांना नागरिकांकडून दंड वसूली केली जात आहे.

लॉकडाऊन शिथिल होत असल्यामुळे नागरिकांचा संचार सर्वत्र वाढला आहे. गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नका, असे आवाहन करून देखील नागरिक घराबाहेर पडत आहेत. लहान, मोठ्या खरेदी करण्यासाठी घरातील एकापेक्षा जास्त सदस्य बाहेर जात आहेत. यामुळे बाहेरच्या लोकांशी संपर्क वाढला आहे. त्यात काही बेजबाबदार नागरिक मास्कचा वापर करत नाहीत. सॅनिटायझरचा वापर करत नाही. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढला आहे. ही बाब लक्षात घेऊन आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या आदेशाने उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांना व दुकानदारांना दंड आकारण्यास सुरुवात केली आहे. खारघर, कळंबोली, कामोठे व पनवेल या चारही प्रभागाचे अधिकारी हे अतिक्रमण विरोधी पथकाच्या माध्यमातून कारवाई करत आहेत. आतापर्यंत विना मास्क फिरणाऱ्या 162 नागरिकांवर दंडात्मक कारवाई करून 16, 200 इतकी दंडाची रक्कम वसूल करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.