ETV Bharat / state

Thane Crime : पोलीस अ‍ॅक्शन मोडवर; उल्हासनगर परिमंडळातील शेकडो गुन्हेगारांवर कारवाई

author img

By

Published : Dec 26, 2022, 7:50 PM IST

ठाण्यातील ( Thane Crime ) उल्हासनगर परिमंडळ आठही पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या शेकडो गुन्हेगारांवर विविध गंभीर कायद्याच्या नियमानुसार कारवाई ( Action against hundreds of criminals ) करण्यात आल्याची माहिती उल्हासनगर परिमंडळचे पोलीस उपआयुक्त डॉ. सुधाकर पठारे ( DCP Dr Sudhakar Pathare ) यांनी नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर दिली आहे. ( Thane Crime )

Thane Crime
पोलीस अ‍ॅक्शन मोडवर
उल्हासनगर परिमंडळचे पोलीस उपआयुक्त डॉ. सुधाकर पठारे माहिती देताना

ठाणे : नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र जय्यत तयारी सुरू असतानाच, गुन्हेगारांना सोन्याची अंडी देणाऱ्या उद्योग नगरी म्हणजेच उल्हासनगर पोलीस परिमंडळ मधील पोलीस ऑक्शन मोडवर असल्याचे दिसून आले. शेकडो गुन्हेगारांवर विविध गंभीर कायद्याच्या नियमानुसार कारवाई ( Action against hundreds of criminals ) करण्यात आल्याची माहिती उल्हासनगर परिमंडळचे पोलीस उपआयुक्त डॉ सुधाकर पठारे ( DCP Dr Sudhakar Pathare ) यांनी दिली आहे. ( Thane Crime )

गुन्हेगार तडीपार होणार : उद्योग नगरी असलेल्या उल्हासनगर, तसेच औद्योगीक वसाहती असेलल्या अंबरनाथ, बदलापूर शहरात गुन्हेगारांनी धुमाकूळ घातला आहे. त्यात गुन्हेगारांना सोन्याची अंडी देणाऱ्या शहरातील नागरिकांसह व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचे वातारण निर्माण केल्याने विविध पोलीस ठाण्यातील पोलिसांनी नामचीन गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. यामध्ये आठ पोलीस ठाण्यात संघटित गुन्हेगारांच्या १० टोळी विरोधात मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल करून ६३ सराईत गुन्हेगारांवर कारवाई केली आहे. तर एमपीडीए कायद्याअंतर्गत ५ नामचीन गुन्हेगारांना अटक करत त्यांना विविध कारागृहात टाकण्यात आले. तर दोन गुन्हेगारांवर कारवाईची प्रक्रिया सुरु आहे. शिवाय गुन्हेगारांचा कणा मोडून काढण्यासाठी वर्षभरात आतापर्यत ५४ गुन्हेगारांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले. तर ५१ गुन्हेगारांना तडीपार करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती पोलीस उपआयुक्त डॉ. सुधाकर पठारे यांनी दिली आहे.

पोलिसांची कारवाईला सुरूवात : दरम्यान, नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर महिलांची छेडछाड करणाऱ्यावर करडी नजर ठेवण्यासाठी महिला पोलीस कर्मचारी असलेल्या दामिनी पथके विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत नेमण्यात आली आहे. तसचे २५ डिसेंबरपासून आठही पोलीस ठाणाच्या हद्दीतील विविध शहरातील चौका चौकासह नाक्या नाक्यावर नाकाबंदी पथके तैनात करण्यात आली आहे. शिवाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य व केंद्र सरकराने जाहीर केलेल्या पंचसूत्री नियमाची कठोरपणे अंमलबजाणी करण्यात येत असल्याची माहितीही पोलीस उपआयुक्त डॉ. सुधाकर पठारे यांनी दिली आहे.

मदतीसाठी या नंबरवर संपर्क : राज्य सरकारने नागरिकांना पोलीस मदतीसाठी नव्याने जाहीर केलेल्या इंमर्जन्सी हेल्पलाईन नंबर ११२ चा सर्वाधिक फायदा ठाणे जिल्ह्यातील शहरी भागातील नागरिकांनी घेतल्याची नोंद राज्यात झाली आहे. यापुढेही नागरिकांमध्ये अधिक जनजागृती होणेसाठी संबधित हद्दीतील पोलीस पथक अलर्ट असून घटनास्थळी केवळ ५ ते ७ मिनिटात दाखल होत आहे. त्यामुळे पोलीस मदत मागणाऱ्या नागरिकांनी तत्काळ इंमर्जन्सी हेल्पलाईन नंबरवर कॉल करावा, असे आवाहन पोलीस उपआयुक्त डॉ. सुधाकर पठारे यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.