ठाणे : सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ७ वर्षीय पीडित मुलगी भिवंडी शहरातील शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका सोसायटीत कुटुंबासह राहते. त्यातच २५ जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास पीडित मुलगी परिसरातील एका कटलरी दुकानातून बांगड्या खरेदी करण्यासाठी घरातून निघाली होती. त्याच सुमारास नराधम तिला इमारतीच्या खाली भेटला. त्यावेळी पीडितेला त्याने विचारले असता, मी बांगड्या आण्यासाठी जात आहे. हे ऐकताच त्याने पीडित मुलीला बांगड्या घेण्यासाठी पैसे देतो म्हणून सांगताच, पीडित मुलीने त्याला नकार दिला. त्यानंतर या नराधमाने पीडित मुलीला सांगितले कि, तुझे वडील माझे मित्र असून चल तुला त्यांच्याकडं सोडतो, असे सांगून तिचे अपहरण करून सोसायटीच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एका दुचाकीवर तिला बसवले.
आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल : त्यानंतर तिच्या मागे दुचाकीवर बसून घृणास्पद चाळे करत असतानाच, या प्रकारामुळे पीडित मुलगी भयभीत होऊन तिने घटनास्थळावरून पळ काढत घर गाठले आणि तिच्यावर घडलेला प्रसंग आईला सांगितला. त्याच दरम्यान घडलेला प्रकार पीडित मुलीच्या वडिलांना माहिती पडताच त्यांनी घर गाठले त्यानंतर पीडित मुलीला घेऊन शांतीनगर पोलीस ठाणे गाठून पीडित मुलीवर घडलेल्या प्रसंगाचे कथन करण्यात आले. पोलिसांनी नराधमाविरोधात भादंवि कलम ३६६ (ए ) ३५४, ३५५ (बी) आणि पोक्सो कायदा कलम ८ आणि १२ नुसार गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला.
आरोपीला शिताफीने अटक : घटनेचे गांभीर्य ओळखून शांतीनगर पोलिसांनी दोन पथके तयार करत सोसायटीसह परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली. त्यावेळी एका सीसीव्हीटी फुटेजमध्ये नराधम पीडित मुलीशी घृणास्पद कृत्य करीत असल्याचे दिसून आले. त्यानंतर या नराधमाचा शोध घेऊन त्याला भिवंडीतून अटक करण्यात आली. या घटनेचा अधिक तपास शांतीनगर पोलीस करीत आहेत.
शिक्षकाचे अश्लील चाळे : उस्मानाबाद शहरातील एका नामांकित शाळेतील शिक्षकाने सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करून गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार मार्च, 2020 रोजी उघडकीस आला होता. त्यामुळे संतप्त जमावाने शाळेत जाऊन त्या शिक्षकास बेदम चोप दिला आणि शहर पोलीस ठाण्यात नेऊन तक्रार दाखल केली होती.
मारत मारत नेले पोलीस ठाण्यात : सहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीशी गेल्या काही दिवसांपासून अश्लील चाळे करून गैरवर्तन करत होता. मुलगी घरी रडत आल्यानंतर पालकांनी तिला विश्वासात घेऊन विचारले असता, तिने संबंधित शिक्षक गेल्या काही दिवसांपासून मांडीवर घेऊन बसवणे, नको त्या ठिकाणी हात लावणे, अश्लील चाळे करून गैरवर्तन करणे, असे प्रकार करत असल्याचे समजले. त्यानंतर मुलीचे पालक आणि काही लोक जाब विचारण्यासाठी शाळेत गेले असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पालकांनी त्यास शाळेतच चोप देवून पोलीस ठाण्यामध्ये मारत नेले. त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता.
हेही वाचा : Kirit Somaiya Criticized Anil Parab: किरीट सोमैयांचा अनिल परबांवर पलटवार; वांद्रेतूनही घेतला काढता पाय