ठाणे - ठाण्याच्या कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत १ सप्टेंबर रोजी बेपत्ता झालेल्या हनुमंत पांडुरंग शेळके या रंगारी ठेकेदाराचे अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापैकी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून अन्य दोन फरार आरोपीचा शोध पोलीस पथक घेत आहे. शिव रामलाल वर्मा, सुरज श्रीराम वर्मा आणि अंकित कुमार सरोज, असे आरोपींची नावे आहे. दरम्यान, अटक केलेल्या दोघांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना 19 सप्टेंबरपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. यापैकी एकाला पोलिसांनी उत्तर प्रदेशच्या अमेठीतून अटक केली असून त्याला सुरक्षेच्या कारणास्तव विमानाने महाराष्ट्रात आणण्यात आले होते.
कुटुंबियांनी केली होती तक्रार -
आरोपी अंकित कुमार सरोज हा हनुमंत शेळके यांच्याकडे कामाला होता. हनुमंत शेळके हा १ सप्टेंबर रोजी रात्री घरी असताना आरोपीने सरोजच्या आईच्या औषधासाठी पैसे नाहीत. ते घेऊन बसस्टॉपवर ये असा कॉल त्याला केला होता. याची माहिती हनुमंत शेळकेने आपल्या पत्नीला दिली. तसेच पैसे देऊन येतो असे सांगून घराबाहेर पडला. मात्र, तो परत न आल्याने तो बेपत्ता तो असल्याची तक्रार शेळकेंच्या कुटुंबियांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात दिली होती.