ETV Bharat / state

Siddhu Muse wala murder : गायक सिद्धू मुसेवाला हत्येप्रकरणातील फरारी आरोपी नेपाळमध्ये ?

author img

By

Published : Jun 11, 2022, 10:08 PM IST

पंजाबच्या मानसा जिल्ह्यात आठ शार्प शुटर यात पंजाबचे ३, राज्यस्थानचे ३ आणि महाराष्ट्राचे दोन शार्पशुटर यांचा समावेश असून सौरभ महाकाल उर्फ सिद्धेश कांबळे ( Saurabh Mahakal alias Siddhesh Kamble ) आणि संतोष जाधव ( Santosh Jadhav ) यांचा समावेश असून हत्येचा कट हा अनेक महिन्यापासून सुरू होता. तर मुसेवाल याच्या जवळच फॅन बनून वावर आणि रेकी करणाऱ्या केकडा याचा उलगडा झाला आहे. दिल्ली पोलिसांनी केकडाला अटक केलेली आहे.

ठाणे - २९ मे २०२२ रोजी पंजाबच्या जवाहरके गावात मानसा जिल्ह्यात आठ शार्पशूटराने ( eight sharpshooters fired ) ६० राउंड बेछूट गोळीबार करीत गायक सिद्धू मुसेवालाची ( singer Sidhu Musewala murder ) हत्या केली. पंजाब सरकारने याची गंभीर दाखल घेतलेली असून पंजाब पोलिसांसह दिल्ली पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस ( Maharashtras Pune Rural Police ) हे हत्येचा उलगडा करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यात दिल्ली पोलिसांना काही प्रमाणात यश मिळाले आहे. तर महाराष्ट्राच्या पुणे ग्रामीण पोलिसांनाही यातील आरोपीला पकडण्यात यश मिळाले आहे.

पंजाबच्या मानसा जिल्ह्यात आठ शार्प शुटर यात पंजाबचे ३, राज्यस्थानचे ३ आणि महाराष्ट्राचे दोन शार्पशुटर यांचा समावेश असून सौरभ महाकाल उर्फ सिद्धेश कांबळे ( Saurabh Mahakal alias Siddhesh Kamble ) आणि संतोष जाधव ( Santosh Jadhav ) यांचा समावेश असून हत्येचा कट हा अनेक महिन्यापासून सुरू होता. तर मुसेवाल याच्या जवळच फॅन बनून वावर आणि रेकी करणाऱ्या केकडा याचा उलगडा झाला आहे. दिल्ली पोलिसांनी केकडाला अटक केलेली आहे. तर दुसरीकडे पुणे ग्रामीण पोलिसांनी सौरभ महाकाल उर्फ सिद्धेश कांबळे याला अटक केलेली आहे. त्यामुळे मुसेवाला याच्या हत्येचे ( Musewalas murder case update ) आणखीन सत्य बाहेर पडणार आहे.

फरार आरोपी संतोष जाधव नेपाळमध्ये?- मुसेवाला याची हत्या करण्यात बिष्णोई गँगचा हात असल्याचे जवळपास स्पष्ट झालेले आहे. यात मुसेवाला याचा फॅन बनवून रेकी करून खबर देणारा केकडा हा बिष्णोई गँगचा सदस्य असून अनेक महिने केकडा हा मुसेवाला यांचा चाहता बनून आसपास वावरत होता. अन त्याच्याच इशाऱ्यानंतर ही हत्या करण्यात आल्याचे समोर आलेले आहे. लॉरेन्स बिष्णोई हा सध्या जोधपूर पोलिसांच्या ताब्यात आहे. २० जून पर्यंत त्याला पोलीस कोठडीत आहे. दरम्यान दिल्ली पोलीस आणि महाराष्ट्राचे पुणे ग्रामीण पोलिसही बिष्णोईला ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र हत्या करणारे सर्व आठ शुटर हे सापडलेले नाहीत. हे आरोपी हत्या करून नेपाळमध्ये दबा धरून बसल्याची माहिती गुन्हेगारी जगतातील सूत्रांच्या आधारे समजत आहे. त्यातच पुण्यात मावळ तालुक्यात मंचर येथे राहणार संतोष जाधव हा बिष्णोई गँगशी संबंधित आहे. तर अटक करण्यात आलेला आरोपी सौरभ महाकाल उर्फ सिद्धेश कांबळे हा संतोष जाधव याच्या गँगचा संपर्कातील आहे. संतोष जाधव हा पूर्वीच हत्या आणि मोक्का अंतर्गत दाखल गुन्ह्यात फरार आहे. तो नेपाळमध्ये फरार असल्याचा सूत्राने दावा केला आहे.

संतोष जाधव हा मुंबईच्या गवळी गँगशी संबंधित नाही? -मावळ तालुक्यात अरुण गवळी याचे साम्राज्य आहे. हे जरी वास्तव असले तरीही मंचरमध्ये आदिवासी गावात राहणार संतोष जाधव याचा गवळी गँगशी संबंध नसल्याची माहिती गुन्हेगारी जगतातून सूत्राच्या आधारे मिळत आहे. संतोष जाधव याची स्वतःची गॅंग पुण्यात आणि ग्रामीण भागात आहे. तो बिष्णोई टोळीशी संलग्न झाला. फरारी असल्याने तो टोळीच्या संपर्कात आल्याने आणि त्याचा वावर वॉन्टेड काळात हा राज्यस्थान, हरियाणा आणि पंजाब येथे असल्याचे सूत्राची माहिती आहे. त्यामुळेच या हत्येत त्याचा सहभाग झाला.

बिष्णोई गॅंग सदस्य आणि जाधवची कारागृहात ओळख - बिष्णोई गँगच्या सदस्यांशी कारागृहात ओळख झाल्यानंतर संतोष जाधव हा बिष्णोई गँगशी संपर्कात आला. त्यानंतर हत्या आणि मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर संतोष जाधव हा फरारी होता. सोबतच सौरभ महाकाल उर्फ सिद्धेश कांबळे हा देखील फरार होता. संतोष जाधव हा वॉन्टेड असताना त्याचा वावर हा राज्यस्थान, हरियाणा, पंजाब आदी राज्यामध्ये दिसत होता, अशी सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे लॉरेन्स बिष्णोई याच्याशी संतोष जाधव याची भेट झालेली असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे फरारी असलेल्या संतोष जाधव आणि सौरभ महाकाल उर्फ सिद्धेश कांबळे यांची मुसेवाला याच्या हत्येसाठी निवड करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. अंडरवर्ल्डच्या सूत्रानुसार मुसेवाल याच्या हत्येनंतर आरोपीनी नेपाळ गाठून आश्रय घेतल्याची चर्चा सुरू आहे.

ऑटोमॅटिक हत्यार खलिस्तान बॉर्डर मार्गे भारतात - मूसेवाला यांच्या सत्तेसाठी वापरण्यात आलेली हत्यारही ऑटोमॅटिक असून ही भारतात सहज रित्या कुठेही उपलब्ध होतात . ऑर्डर परिसरातून ही हत्यारे भारतात येतात आणि त्याचा वापर अशा हत्याकांड यांसाठी गुन्हेगार या टोळ्यांकडून केला जात आहे. काही दिवसांपूर्वी सध्या कारागृहात असलेले एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना देखील मुंबईमधून एके ४७ मिळाली होती. तिचा वापर देखील करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.