ETV Bharat / state

खंडणी प्रकरणातील आरोपींचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज, एका आरोपीने जामीन अर्ज मागे घेतला दुसऱ्याची सुनावणी ९ ऑगस्टला - ठाणे न्यायालय बातमी

खोट्या गुन्ह्यात अडकवून कोट्यवधींची रक्कम वसूल केल्या प्रकरणी तक्रारदारांकडून ठाणे नगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात तब्बल २८ आरोपी आहेत. त्यापैकी दोघांनी सोमवारी (दि. २ ऑगस्ट) ठाणे न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. मात्र, एका आरोपीने अर्ज मागे घेतला तर दुसऱ्या अर्जावर आज सुनावणी न घेता ९ ऑगस्टला सुनावणी होणार असल्याची माहिती तक्रारदाराचे वकील सागर कदम यांनी दिली.

v
v
author img

By

Published : Aug 2, 2021, 8:56 PM IST

Updated : Aug 2, 2021, 10:10 PM IST

ठाणे - खोट्या गुन्ह्यात अडकवून कोट्यवधींची रक्कम वसूल केल्या प्रकरणी तक्रारदारांकडून ठाणे नगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात तब्बल २८ आरोपी आहेत. त्यापैकी दोघांनी सोमवारी (दि. २ ऑगस्ट) ठाणे न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. मात्र, एका आरोपीने अर्ज मागे घेतला तर दुसऱ्या अर्जावर आज सुनावणी न घेता ९ ऑगस्टला सुनावणी होणार असल्याची माहिती तक्रारदाराचे वकील सागर कदम यांनी दिली. तर दुसरीकडे मनी लॉन्ड्रिंगमध्ये आरोपींची संगनमताने गुन्हा केला असल्याने २८ आरोपींवर मोकोका लावा, असा अर्ज सह आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांना केला आहे. तर तक्रारदारांच्या पोलीस संरक्षणासाठी अर्ज केल्याची माहितीही रियाज भाटी यांचे वकील सागर कदम यांनी दिली.

माहिती देताना विधीज्ञ

ठाणे नगर पोलीस ठाण्यात ३० जुलैला दाखल झालेल्या गुन्ह्यात माजी ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंह, दीपक देवराज, एन. टी. कदम, चकमक (एनकाउंटर) फेम प्रदीप शर्मा, ठाणे खंडणी विरोधी पथकाचे माजी वरिष्ठ राजकुमार कोथीमिरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक मोरे, पोलीस कर्मचारी चौधरी, विकास दाभाडे, रितेश शहा, दिपल अग्रवाल, रवी पुजारी, संजय पुंनमिया, अनिल सिंग, बच्ची सिंग, जुबेर मुजावर, सुनील देसाई, मनीष शहा उर्फ चोटी, किशोर अग्रवाल, बरखा अग्रवाल, समाजसेवक बिनू वर्गीस, तारीख परवीन, देवा भानुशाली, अंकित भानुशाली, विशाल कारिया , प्रदीप सोदानी, प्रशांत कोठारी, दीपक कपूर, नागेश यांच्याविरोधात तक्रारदार केतन तन्ना, सोनू जालना आणि रियाज भाटी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन भा.दं.वि.चे कलम ३८४, ३८६, ३८७, ३८९, ३९२, ३२४, ३२३, ५०४, ५०६, ५०६ (२), १०९, १६६, १२० ब आणि २५ नुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर यातील आरोपी विकास दाभाडे आणि सुनील देसाईने ठाणे न्यायालयात अटक पूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. ठाणे न्यायालयात सुनील देसाई यांच्या अर्जावर सुनावणी झालीच नाही. तर हीच सुनावणी ९ ऑगस्टला होणार आहे. दरम्यान, अटकपूर्व जामीन अर्ज करणारा दुसरा आरोपी विकास दाभाडेने आपला अर्ज मागे घेतला. आता सुनील देसाईच्या अर्जावर ९ ऑगस्टला सुनावणी होणार असल्याची माहिती तक्रारदार रियाज भाटी यांचे वकील सागर कदम यांनी दिली.

मोकोका अंतर्गत कारवाईसाठी सहआयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांकडे अर्ज

ठाणे नगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात तब्बल २८ आरोपींचा समावेश असून हवाला झाल्याचे स्पष्ट होत असल्याने या २८ आरोपींवर हवाला प्रकरणी संगनमताने केलेल्या गुन्ह्या प्रकरणी संघटित गुन्हेगारी (मोकोका) अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन सह आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त ठाणे यांना देण्यात आल्याची माहितीही वकील सागर कदम यांनी दिली. तर दुसरीकडे कोट्यवधींचा हवाला रॅकेट असून रक्कम आरोपी सुनील देसाई यांनी स्वीकारलेली असल्याचे स्पष्ट करत या प्रकरणाची ईडीमार्फत चौकशी करण्यासाठी निवेदन देण्यात आलेले आहे.

तीन तक्रारदारांकडून ७ कोटीच्या आसपास खंडणी उकळली

सात कोटीच्या आसपास खंडणी उकळल्याचे समोर आले असून यातील अटकपूर्व जमीन अर्ज करणारे आरोपी सुनील देसाई यांनी ही रक्कम स्वीकारल्याची तक्रार आहे. तक्रारदार रियाज भाटी यांच्याकडून दीड कोटी रुपये उकळण्यात आलेले होते. ठाणे न्यायालयात तक्रारदाराचे वकील सागर कदम उपस्थित होते. सोनू जालना, केतन तन्ना आणि रियाज भाटी यांनी तक्रार नोंदविलेली होती. रवी पुजारीकडून धमकावणे आणि नंतर वसुली करणे संघटित गुन्हेगारी झाल्याचा आरोपही वकील कदम यांनी केला.

तक्रारदारासाठी पोलीस संरक्षणाची मागणी

कोट्यवधींच्या वसुली प्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात माजी ठाणे पोलीस आयुक्तसह एनकाउंटर फेम प्रदीप शर्मा, रवी पुजारी यांच्या नावाचा समावेश आहे. त्यामुळे तक्रारदार रियाज भाटी, केतन तन्ना आणि सोनू जालना यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यापासून विविध माध्यमातून दबाव येत असून त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याने या तिन्ही तक्रारदारांना पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी केल्याची माहिती अॅड. सागर कदम यांनी दिली.

जामिनासाठी अर्ज करणारा आरोपी देसाई ख्वाजा युन्नूस प्रकरणातील आरोपी

ठाणे न्यायालयात सोमवारी गुन्हा दाखल झालेल्या २८ जणांपैकी आरोपी सुनील देसाई आणि विकास दाभाडे यांनी अटकपूर्व जमीनासाठी ठाणे न्यायालयात अर्ज केला. मात्र, न्यायालयात सुनावणी होण्यापूर्वीच विकास दाभाडे यांनी जमीन अर्ज मागे घेतला. तर सुनील देसाई यांच्या अर्जावर सुनावणीच्या झाली नाही. ९ ऑगस्टला सुनावणी होणार असल्याचे वकील सागर कदम यांनी सांगितले. तर आरोपी सुनील देसाई हा ख्वाजा युन्नूस प्रकरणातील आरोपी असून तो जामिनावर सुटला असल्याचे वकील सागर कदम यांनी सांगितले.

आरोपींना अटक आणि मोकोका दाखल होण्याची शक्यता

ठाणे नगर पोलीस ठाण्यात तक्रारदार सोनू जालना, केतन तन्ना आणि रियाज भाटी यांच्या तक्रारीनुसार २८ आरोपींवर भादंवि ३८४, ३८६, ३८७, ३८९, ३९२, ३२४, ३२३, ५०४, ५०६, ५०६(२), १०९, १६६, १२० ब आणि २५ नुसार गुन्हा दाखल झाला असून सर्वाधिक कलाम हे नॉनबेलेबल असल्याने या प्रकरणातील सर्वच आरोपीना अटक होण्याची दात शक्यता आहे. तर या प्रकरणात रवीपुजारी माध्यमातून धमकावणे आणि नंतर पैसे उकळणे अशी संघटित गुन्हेगारी करण्यात आल्याने या २८ आरोपींवर मोकोका अंतर्गत कार्वाईचीही शक्यता निर्माण झाल्याचे तक्रारदार रियाज भाटी यांचे वकील सागर कदम यांनी वर्तविली आहे.

हेही वाचा - धक्कादायक! ओला चालकाची कारमध्येच गळा आवळून हत्या, आरोपी फरार

Last Updated : Aug 2, 2021, 10:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.