ठाणे - पाळलेले बकरे देण्यास नकार दिल्यामुळे एका व्यक्तीवर मध्यस्थी करणाऱ्यावर तलवारीने हल्ला करणाऱ्या आरोपीस पोलीस पकडण्यासाठी गेल्यास त्याने इमारतीवरुन उडी मारली. मोहसीन चिरा, असे त्या आरोपीचे नाव असून त्याच्याविरोधात पोलीस ठाण्यात शंभरहून अधिक गुन्हे दाखल आहेत. त्याला उपाचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्याने त्याचा मृत्यू झाला आहे
मृत मोहसीन चिरा आणि त्याचे तीन सहकारी हे तक्रारदार मोहम्मद हुसेन सलील शेख (वय 38 वर्षे, रा. 303, श्रीलंका, कौसा, मुंब्रा) हे टुरिस्ट वाहन चालविण्याचा व्यवसाय करतात. त्याने आंबेडकर पाडा, श्रीलंका, जुबली पार्क कौसा येथे काही बकरे आणि 10 ते 15 कोंबड्या पाळल्या होत्या. 14 जुलैला आरोपी मोहसीन चिरा आणि त्याचे इतर तीन साथीदार हे शेख यांच्याकडे आले व बकऱ्याची मागणी केली. तेव्हा तक्रारदार शेख यांनी बकरे विकण्यासाठी नाही तर पाळण्यासाठी आणल्याचे सांगितले. यावर राग अनावर झालेल्या मोहसीन चिरा याने शेख यांना शिवगाळ केली. त्याच्या सहकाऱ्यांनी शेख यांच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला आणि मोहसीन याने तलवारीने त्यांच्या डोक्यात वार केला. त्याचवेळी मोहसीन याची समजूत काढण्यासाठी आलेला शेख यांचा मित्र दाऊद अन्सारी याने मध्यस्थी करत असल्याचा रागात मोहसीन चिरा आणि त्याच्या सहकाऱ्यांनी अन्सारी यांनाही मारहाण केली. मोहसीन चिरा याने तलवारीने अन्सारीच्या पाठीवर आणि हातावर वार केला. जखमी अवस्थेत शेख आणि अन्सारी यांना कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविताच पोलीस पथकाने चिरा याचा शोध सुरू केला. दरम्यान, पोलिसांना पाहून चिरा याने इमारतीवरून उडी घेतली. यात तो गंभीर जखमी झाला आणि त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मोहसीन चिरा हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून त्याच्यावर शंभरच्यासपास गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. मुंब्रा पोलीस अधिक तपास करीत आहेत.
बकरा देण्यास नकार देणाऱ्या अन् मध्यस्थी करणाऱ्यावर तलवार हल्ला, इमारतीवरून उडी घेतल्याने आरोपीचा मृत्यू - thane police news
तलवार हल्ल्यातील आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पोलीस गेले होते. पोलिसांना पाहताच आरोपीने इमारतीवरुन उडी घेतली. त्याला जखमीअवस्थेत रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.