ठाणे - पीएमसी बँकेवर आरबीआयने निर्बंध आणले आहेत. यामुळे बँकेच्या खातेदारांच्या व्यवहारांवर मर्यादा आल्या आहेत. ही बातमी समजताच जिल्हातील पीएमसी बँकेंच्या शाखांमध्ये ग्राहकांनी तोबा गर्दी केली आहे.
हे ही वाचा - पीएमसी बँकेच्या खोपोली शाखेसमोर ग्राहकांची गर्दी, ग्राहकांमध्ये संतापाची लाट
बदलापूरमधील कात्रप येथील पीएमसी बँकेच्या शाखेसमोर खातेदारांनी गोंधळ घातला. यावेळी खातेदार आणि बँक कर्मचाऱ्यांमध्ये वाद होण्यापूर्वीच बदलापूर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.
हे ही वाचा - पीएमसी बँकेवर 'आरबीआय'कडून निर्बंध, मुंबईत बँक शाखेबाहेर लोकांची गर्दी
बँकिंग रेग्युलेशनमधील कलम 35 अ अंतर्गत पीएमसी बँकेचे सर्व व्यवहार बंद करण्याचा निर्णय रिझर्व बँकेने घेतला आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळपासून पीएमसी बँकेच्या सर्व शाखांमध्ये व्यवहार ठप्प झाले आहेत. तसेच बँकेचे ऑनलाइन व्यवहारही बंद केले आहेत.
हे ही वाचा - पीएमसी बँकेच्या संदर्भात आरबीआय व अर्थ मंत्रालयाशी संपर्क सुरू आहे - किरीट सोमय्या
दरम्यान, हे निर्बंध सहा महिन्यांसाठी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल असे बँक व्यस्थापनाकडून सांगण्यात आले आहे.